रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी च्या वतीने पूरग्रस्तांसाठी दिली साडे सहा टन निरजूंतिकी करण साधने..

दौंड :- आलिम सय्यद

कोकण, महाड, पुरग्रस्तनसाठी मदतीचा हात म्हणून कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी यांनी एकूण पाच टन ब्लिचिंग पावडर व दीड टन सोडिअम हायफो क्लोराईड असा मदत म्हणून या पुरग्रस्तांनसाठी देण्यात आली. पूर आल्याने परिसरात झालेल्या घाणीने रोगराया पसरू नये म्हणून या पूरग्रस्त परिसरात एकूण साडेसहा टन ब्लिचिंग पावडर व सोडिअम हायफो असा पूरग्रस्तां साठी एक छोटीशी मदत म्हणून देण्यात आली असून गेल्या वेळेस ही असाच या भागात पूरग्रस्तांना रोटरी क्लबच्या माध्यमातून पंचवीस टन निरजूंतिकीकरण करण्यासाठी साधने दिली होती यावेळेस ही एक छोटीशी मदत केली असल्याचे रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसीचे अध्यक्ष मनीष अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष अग्रवाल, बारामती रोटरी क्लब अध्यक्ष संजय दुधाळ,रोटरी क्लबचे सदस्य तसेच कुरकुंभ ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच विनोद शितोळे, कुंभा केमिकल्स चे शशिकांत पाटील, विकास टोपले, युवराज घार्गे, शहाजी पवार, भास्कर शेळके, दुशांत जळगावकर , नरशिंग थोरात, दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल शितोळे, हे यावेळी उपस्तिथ होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!