
ओरा फाइन ज्वेलरीकडून पुण्यामध्ये आयकॉनिक लक्ष्मी रोड स्टोअरचे पुन्हा भव्य उद्घाटन..
पुणे, एप्रिल १0, २०२४: शुभ सण गुढीपाडवा जवळ आला असताना ओरा हा भारतातील अग्रगण्य डायमंड ज्वेलरी ब्रँड नारायण पेठ, लक्ष्मी रोड, पुणे येथे त्यांच्या ओरा स्टोअरचे रिलाँच व उद्घाटन करण्यास सज्ज आहे. १६६८ चौरस फूट जागेवर असलेले नवीन स्टोअर अत्याधुनिक शोरूमच्या माध्यमातून दागिने खरेदी करण्याचा अनुभव नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ओराची सिग्नेचर डायमंड ज्वेलरी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये आधुनिक कलेक्शन्ससह भारतातील सर्वात चमकदार पेटण्टेड हिरा – विशेष ७३-पैलूंचे ओरा क्राऊन स्टारचा समावेश आहे. आधुनिक इंटीरिअर्स, लक्झरीअस आसन सुविधा आणि समर्पित ब्राइडल लाऊंजसह हे स्टोअर ग्राहकांना अपवादात्मक शॉपिंग अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहे.
डिझाइन करण्यात आलेले इंटीरिअर ब्रँडच्या विशेष डायमंड ज्वेलरीशी सुसंगत आहे, ज्यामध्ये समकालीन दागिन्यांपासून कालातील क्लासिक्सचा समावेश आहे. हे नवीन स्टोअर ब्रँडचे उच्च सेवा मानक, वैविध्यपूर्ण डिझाइन ऑफरिंग्ज आणि ग्राहक-अनुकूल धोरणे कायम ठेवेल. ब्रँडचा सर्वोत्तमतेप्रती वारसा कायम राखण्याप्रती कटिबद्ध स्टोअर अपवादात्मक सेवा, डिझाइन्सची व्यापक श्रेणी आणि ग्राहक-अनुकूल धोरणे प्रदान करत राहिल, ज्यामुळे स्टोअरला दिलेली प्रत्येक भेट संस्मरणीय असेल, ज्यामध्ये गुढीपाडवा सण साजरीकरणादरम्यानची समृद्धता व नवीन शुभारंभाचा उत्साह सामावलेला आहे.
रिलाँचचबाबत मत व्यक्त करत ओराचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपू मेहता म्हणाले, ”आम्हाला पुण्यातील लक्ष्मी रोड स्टोअर येथे रिलाँचसह इन-स्टोअर अनुभवाची घोषणा करण्याचा आनंद होत आहे. नवीन सुधारित स्टोअरमधून बहुमूल्य ग्राहकांसाठी सर्वसमावेशक व उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्याप्रती ओराची कटिबद्धता दिसून येते. आम्हाला समजले की, आम्ही ग्राहकांना मोठ्या आकाराच्या स्टोअरसह उत्तम सेवा देऊ शकतो, ज्यामध्ये अधिक इन्व्हेण्टरी, अपवादात्मक नवीन डिझाइन्स, अनेक विविध प्रकारच्या उत्पादन श्रेणी सामावू शकतात. सुधारित स्टोअरमध्ये आता मोठी इन्व्हेण्टरी समाविष्ट आहे, ज्यामध्ये अपवादात्मक नवीन डिझाइन्स आणि विविध प्रकारच्या उत्पादन श्रेणींचा समावेश आहे.”
ओरा ग्राहकांच्या विविध पसंतीची, तसेच वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आकर्षक ज्वेलरी कलेक्शन्सची वैविध्यपूर्ण श्रेणी देते. आमचे लक्झरीअस ‘एकता’ – द वेडिंग कलेक्शन आमच्या विद्यमान कलेक्शन्समधील नवीन भर आहे, ज्यामध्ये अस्त्र, डिझाइर्ड व प्लॅटिनम कलेक्शनचा समावेश आहे. प्रत्येक कलेक्शनमध्ये अद्वितीय व लक्षवेधक डिझाइन आहेत, ज्यामधून आमच्या ब्रँडची सर्वोत्तमता व दर्जाप्रती कटिबद्धता दिसून येते. आमच्या ऑल-इन-वन बॉक्स सेटसह उत्तम लक्झरीचा अनुभव घ्या, ज्यामधून सर्वोत्तम कारागिरी दिसून येते. आकर्षक पेण्डंट व कानातले विशेषत: वाढदिवस, अॅनिव्हर्सरीज व प्रत्येक उत्साहपूर्ण प्रसंगासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. ओरा रंगीत खड्यांसह सजवण्यात आलेल्या चमकदार डायमंड नेकलेसपासून बारकाईने तयार करण्यात आलेल्या बॉक्स सेट्सपर्यंत वैविध्यपूर्ण श्रेणीसाठी पसंतीचा ब्रँड आहे.
ओराची कारागिरी व आकर्षकतेप्रती कटिबद्धता त्यांच्या कलेक्शन्सच्या माध्यमातून सुरेखरित्या दाखवण्यात आली आहे, ज्यामधून प्रत्येक दागिना प्रेम व साजरीकरणाची अद्वितीय गाथा सांगण्याची खात्री मिळते. ओरा १०० टक्के प्रमाणित दागिन्यांसह कॉम्प्लीमेण्टरी विमा व मोफत आजीवन देखभाल सेवा प्रदान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रँड हिऱ्यांसाठी आजीवन एक्स्चेंज, बायबॅक व सेव्हन-डे रिटर्न पॉलिसी देतो. तसेच ओरा ६ महिन्यांची अपग्रेड सुविधा देतो आणि ब्रँडचे सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क प्रमाणित आहेत.
लॉंच साजरीकरणाचा भाग म्हणून ओरा नवीन स्टोअरला भेट देणाऱ्या ग्राहकांना विशेष उद्घाटनीय सूट, स्पेशल ऑफर्स देणार आहे.
हिऱ्यांच्या दागिन्यांवर जवळपास २५ टक्के सूट (मर्यादित कालावधीसाठी)*
ईएमआय सुविधांवर ० टक्के व्याज*
जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर १०० टक्के एक्स्चेंज मूल्य
*अटी व नियम लागू