मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल “हम दो हमारे बारा” चित्रपट निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा-जोएफ जमादार

श्रीरामपूर प्रतिनिधी:

हम दो हमारे बारा या चित्रपट निर्मात्यांनी सदरील चित्रपटात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जे.जे.फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जोएफ जमादार आणी सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळूंके यांना दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, आपल्या भारत देशामध्ये हल्ली नवीन संस्कृती उदयास आली आहे, ती म्हणजे मुस्लिम समाजाचा द्वेष करणे, जाती-जातीमध्ये जातीय तेढ निर्माण करणे अशी सध्याची अवस्था झालेली आहे. या पुर्वी कश्मीर फाईल्स, केरला स्टोरी आणि अता “हम दो
हमारे बारा” असे वादग्रस्त चित्रपट बनवण्यात आलेले असून या चित्रपटाचे निर्माते रवी गुप्ता, वीरेंद्र भगत आणि संजय नागपाल यांच्यावर मुस्लिम समाजाच्या व विशेषत: मुस्लिम महिलांच्या भावना दुखावल्याबद्दल
सदरील चित्रपट निर्मात्यांवर त्वरित भा.द‌ वि. कलम १५३,१५३ अ,१५३ ब, २९५ अ, २९८ ,५०४,५०५, ५०६,५०९ व ३४ आणि तसेच महिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ “अ” व ६६ “फ” इत्यादी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी.कारण यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड रोष निर्माण होवून पुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ही नाकारता येवू शकणार नाही करीता वेळेतच दखल घेवून उचित कार्यवाही केलेली योग्य राहील या हेतून सदरील नम्र निवेदनाद्वार विनंती असल्याचे म्हटले आहे.
याप्रसंगी जे.जे. फाऊंडेशनचे संस्थापक,अध्यक्ष जोएफ जमादार,आसिफ तांबोळी,कलीम शेख, रउफ शेख, सलमान शाह,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!