ॲक्सिस बँकेतर्फे आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त महाराष्ट्रातील ७५० हून अधिक एमएसएमईचा सत्कार

 

नागपूर, २८ जून २०२४: गतिमान आणि यशस्वी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला महत्त्वपूर्ण मानवंदना म्हणून भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त महाराष्ट्रातील ७५० हून अधिक एमएसएमई ग्राहकांचा सत्कार केला. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई, सातारा, अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नांदेड, रायगड, सोलापूर, सांगली इ. ठिकाणच्या ॲक्सिस बँकेच्या निवडक शाखांमध्ये हा सन्मान समारंभ करण्यात आला.

ॲक्सिस बँकेच्या वरिष्ठ प्रतिनिधी – श्री सारंग दानी, रीजनल ब्रांच बैंकिंग हेड – वेस्ट 1; श्री टी रामनाथन, नेशनल सेल्स मैनेजर – वर्किंग कॅपिटल; श्री मिलिन उल्हास कारभारी, नेशनल सेल्स हेड – मेडिकल एक्विपमेंट; श्री विवेक प्रभाकर, असेट्स जियोग्राफी हेड – कमर्शियल बैंकिंग कवरेज ग्रुप (सीबीजी); श्रीमती स्वाति मुकुंद चंद, लायबिलिटीज जियोग्राफी हेड – कमर्शियल बैंकिंग कवरेज ग्रुप (सीबीजी); सुश्री स्वाति चक्रवर्ती, सर्कल हेड – मुंबई 1; श्री केदारसिंग ठाकुर, सर्कल हेड – मुंबई 2; श्री रवि प्रभाकर दलाल, सर्कल हेड – मुंबई 3; श्री राजीव कुमार, सर्कल हेड – नागपुर; सुश्री सृष्टि रंजन नंदा, सर्कल हेड – पुणे, यांनी एमएसएमई ग्राहकांना बक्षीस प्रमाणपत्र प्रदान केले. आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रात आणि राज्याच्या आर्थिक विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान केला. जोडीला, काही एमएसएमई ग्राहकांचा त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी रिलेशनशिप मॅनेजर्सकडून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगाच्या निमित्ताने ॲक्सिस बँकेने एमएसएमईजना त्यांचा खर्च वाचवण्यासाठी आणि अधिक सहज आणि त्वरितपणे निधी मिळवण्यासाठी सक्षम करत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ पुरविणाऱ्या विशेष योजनांच्या संचाचे अनावरण केले. बँकेने सध्याच्या एमएसएमई ग्राहकांना सुरक्षित खेळते भांडवल उत्पादनांसाठी प्रक्रिया शुल्कावर ५०% सूट देऊन आधीपासून पात्र योजनांचा विस्तार केला. तसेच एमएसएमईजना चांगल्या व्याज दराने सिक्युरिटी ठेवायला न लागणारी ईएमआय-आधारित कर्जे सादर केली आणि प्रक्रिया शुल्क कमी केले.

या उपक्रमाविषयी बोलताना ॲक्सिस बँकेच्या प्रेसिडेंट एंड हेड – ब्रांच बैंकिंग, अर्निका दीक्षित म्हणाल्या, “भारताच्या आर्थिक क्षेत्रात एमएसएमईंची किती महत्त्वाची भूमिका आहे हे ओळखून ॲक्सिस बँक एमएसएमईंना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी समर्पित आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यावर आमचा विश्वास असून एमएसएमई विभाग कार्यक्षम आणि वेगवान राहील हे सुनिश्चित करत प्रगत डिजिटल बँकिंग उत्पादने आणि सेवांनी त्यांना सुसज्ज करणे याचा यात समावेश आहे. आमच्या एमएसएमई ग्राहकांच्या आकांक्षा आणि कामगिरीचा आनंद साजरा करताना आम्हाला अभिमान वाटतो. समृद्ध आणि स्वावलंबी राष्ट्रासाठी योगदान देण्याच्या एमएसएमईंच्या प्रवासाला आमचे पाठबळ असल्यामुळे ‘विकसीत भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी आमचा दृष्टिकोन सुसंगत आहे. नावीन्यपूर्ण आणि अनुकूलनक्षमतेसह देशातील एमएसएमई सतत मर्यादा ओलांडून पुढे वाटचाल करत आहेत. या गतिमान उद्योजकांसाठी विकास आणि प्रगतीपथाचे नवीन मार्ग तयार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

गेली अनेक वर्षे, ॲक्सिस बँक एमएसएमई ग्राहकांना विशेषकरून त्यांच्या सतत बदलत असलेल्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचा एकूण ग्राहक अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केलेल्या अनुकूल योजना आणि उपक्रमांसह सक्षम बनवत आहे.
ॲक्सिस बँकेचे काही उपक्रम पुढीलप्रमाणे-
विनाअडथळा व्यवहारांद्वारे उत्पादकता उंचावण्यासाठी डिझाइन केलेले मोबाइल-प्रथम व्यवसाय बँकिंग प्रस्ताव ‘निओ फॉर बिझनेस’ सादर
आरबीआय इनोव्हेशन हबच्या सहकार्याने पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिटसाठी (PTPFC) अत्याधुनिक वित्तपुरवठा सुविधा सादर
लास्ट माईलच्या एसएमई ग्राहकांसाठी बचत आणि चालू बँक खाती अखंड, विना अडथळा सुरू करण्याची सुविधा
एमएसएमईएसच्या गरजेनुसार तयार केलेली मजबूत पुरवठा साखळी अर्थपुरवठा सुविधा सादर
एमएसएमई ला नवीन अत्याधुनिक धोरणे, कामकाज यंत्रणा आणि नियामक माहिती यांनी सुसज्ज करत ‘इव्हॉल्व्ह’ ही वार्षिक ज्ञान विस्तार मालिका
दरवर्षी ‘इंडिया एसएमई 100 अवॉर्ड्स’ मध्ये एमएसएमईएसच्या अतुलनीय योगदानाचा आणि यशाचा गौरव

३१ मार्च २०२४ पर्यंत, ॲक्सिस बँकेचा एकूण उद्योगक्षेत्रातील एमएसएमई क्रेडिटमध्ये ८.४% इतका बाजारपेठीय हिस्सा आहे. एकूण कर्जाच्या मिश्रणात लक्षणीय योगदान देत ॲक्सिस बँकेच्या एसएमई कर्जांमध्ये १७% ची वार्षिक वाढ आणि ५% ची तिमाही ते तिमाही वाढ दिसून आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!