पश्चिम महाराष्ट्रराजकीय

घेरडी ग्रामपंचायत येथे 229 वीआद्यक्रांतीविर नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

शशिकांत कोळी / घेरडी


घेरडी तालुका सांगोला हे गाव अप्रुपा नदीच्या तीरावर वसलेले सांगोला , मंगळवेढा, व जत या तीन तालुक्याच्या मध्यभागी वसलेले हे वैशिष्ट्य पूर्ण गाव असून या गावांमध्ये अनेक जयंती साजरी होतात त्यात आणखी एक जयंती म्हणून आद्यक्रांतीविर नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्याचे घेरडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी ठरविले व ग्रामपंचायत मध्ये जयंती घेण्याचे ठरविले
इंग्रजांना हैराण करणारा पहिला भारतीय स्वातंत्र्य सेनानी असणारे आद्यक्रांतीविर नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती घेरडी ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

या जयंती साठी घेरडी गावचे विद्यमान सरपंच बिरा पुकळे ,राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सोमा(आबा) मोटे, अंबादास जगधने उपसरपंच, तुकाराम औताडे सर माजी सरपंच, सिदा मेटकरी ग्रामपंचायत सदस्य, परमेश्वर गेजगे अखिल भारतीय होलार समाज संघटना सोलापूर संपर्क प्रमुख ,हरी लंबे ग्रामपंचायत लिपिक, तुकाराम गळवे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी हे प्रमुख उपस्थित होते .
ही जयंती यशस्वी करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना घेरडी चे कार्यकर्ते बापू गुजले शिवसेना नेता घेरडी, मोहन गुजले, सुनील बुधावले, राजाराम गुजले, बाबु गुजले ,शंकर गुजले, सतीश गुजले, रावसाहेब चव्हाण, समाधान चव्हाण, दत्ता खरकदारे आदी कार्यकर्त्यांनी सोशल डिशटनशिंग चे पालन करून अथक परिश्रम घेतले.

SHARE
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close