देशाचे भविष्य सर्वोतोपरी विद्यार्थ्यांवर अवलंबून – प्रा डॉ मनोहर सुरवाडे
फैजपूर

—————————————-
फैजपुर / राजु तडवी
कोणत्याही देशाची प्रगती विद्यार्थ्यांच्या क्षमता, कौशल्य आणि नावीन्यपूर्ण संशोधन या बाबींवर अवलंबून असून सकारात्मक जनमत घडवण्याचे सामर्थ्य प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असते. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा विकास, संस्काराची जाण आणि आणि देशाच्या प्रगतीत सहभाग देण्याची वृत्ती यांचा विकास केल्यास आपला देश अवघ्या विश्वाला आदर्शवत ठरेल असे प्रतिपादन प्रा डॉ मनोहर सुरवाडे यांनी केले.
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आयोजित विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा येथील शाळा प्रवेशाच्या स्मृती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या परीपत्रकान्वये ‘विद्यार्थी दिवस’ साजरा केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ एस व्ही जाधव होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय व भारताच्या सामाजिक आणि राजकीय योगदान यावर सविस्तर विचार मांडलेत. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात डॉ एस व्ही जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सातारा येथील शाळाभेट प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी रीतीने मांडून देशाला शिक्षण क्षेत्रातील शूरवीर डॉ बाबासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. ज्यांना अंतरंगातून मोठ व्हायचं असेल त्यांनी डॉ बाबासाहेबांचे विचार आणि आचार अंगी उतरवावे असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.