औरंगाबादमराठवाडा

जनतेच्या हृदयात जागा बनवणारे पहिले पोलीस अधिकारी उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड

विहामांडवा

जनतेच्या हृदयात जागा बनवणारे पहिले पोलीस अधिकारी उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड साहेब यांची बदली रद्द व्हावी आसे नागरिकांची इच्छा.

विहामांडवा : प्रतिनिधी, महाराष्ट्र न्यूज 10, (शेख सिराज)
तालुक्यातील पाचोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विहामांडवा पोलीस चौकीवर सेवा बजावत असणारे गोरक्षनाथ खरड यांची बदली रद्द व्हावी अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,विहामांडवा पोलीस चौकी वर कर्तव्यदक्ष सेवा बजावत असणारे उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरडसाहेब दीड वर्षापासून सेवा बजावत होते . त्यांनी कधीही आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे त्यांनी कधीच जाणीव होऊ दिली नाही.त्यांनी गरीब-श्रीमंत या लोकांना कधीही त्यांच्या प्रतिष्ठेचे प्रमाणे वागणूक दिली नाही, सर्वांना समानतेची वागणूक त्यांनी दिलेली आहे तसेच गुन्हेगार व्यक्तींनाही ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत .समजावून सांगून ही जर गुन्हेगार ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल ,तर त्याला त्याची जागा दाखवण्याची ही त्यांच्यामध्ये धमक आहे ,त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीमध्ये आरोपींना त्यांनी समजावून सांगून संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ,संधी देऊनही ही जर आरोपींमध्ये सुधारणा होत नसेल तर त्याला 100% कायदेशीर गुन्हा नुसार कारवाई करीत होते, त्यामुळे त्यांचा शिकवणीचे भान ठेवून परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्येही सुधारणा झालेली दिसत आहे. तसेच कोणत्याही वेळी, कितीही वाजता, कोणत्याही ठिकाणी, फोन येताच क्षणी धावून येणारे हेच एकमेव अधिकारी आहेत ,आज पर्यंत पाचोड पोलीस स्टेशन मध्ये उपनिरीक्षक म्हणून बऱ्याच अधिकाऱ्यांनी कामगिरी बजावलेली आहे. परंतु गोरक्षनाथ खरड यांनी इतर कर्मचारी पेक्षा आदर्श व सहानुभूतीची कामगिरी बजावल्यामुळे त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण आहे . तसेच त्यांच्या कार्यकाळात मध्ये एखादी घटना वगळता,कोणतीही घटना घडलेली नाही, एखादी घटना घडली असेल ती फक्त पोलीस यंत्रणेच्या कमतरतेमुळेच,जर पोलिस यंत्रणा पुरेशी असती तर ती ही घटना घडली नसती, विशेष महत्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता असताना सुद्धा जवळपास 50 ते 60 खेड्यांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी कधीही त्यांना कंटाळा आल्याची जाणीवही होऊ दिलेले नाही , तसेच त्यांनी नोकरीमध्ये ही विशेष कामगिरी बजावलेली जलद गतीने गंभीर गुन्ह्याचे तपास केले आहे, जातीय धार्मिक सलोखा राखला, कोणतीही घटना घडल्यानंतर तत्काळ घटनास्थळी जाऊन योग्य ती कारवाई केलेली आहे,सर्व घटकांशी चांगला समन्वयक ,चांगला जनसंपर्क ,सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे, तसेच लॉक डाऊनकाळामध्ये हातावर पोट असणाऱ्या काही शेकडोगरीब कुटुंबांना मदत केली आहे, तसेच लोक डॉन काळामध्ये पोलीस ठाणे पाचोड दूरक्षेत्र विहामांडवा, व परिसरातील ग्रामपंचायत ,आरोग्य विभाग ,महसूल विभाग, यांच्याशी योग्य समन्वय ठेवूनअत्यंत प्रभावी पणे अंमलबजावणी केल्यामुळेच परिसरात सर्वात कमी पुरणाचे रुग्ण सापडले आहेत त्यामुळे आधी विहामांडवा पूर्ण मुक्त झाले होते. अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडले आहे व आशिया अधिकाऱ्याची बदली झाल्याची बातमी परिसरात कळताच नागरिकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे ,त्यांना किमान त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत तरी विहामांडवा चौकीवर काम करण्याची संधी द्यावी ,तसेच ते कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत ,कधीही कोणावर अन्याय केलेला नाही ,सर्व जाती-धर्मांमध्ये मिळून-मिसळून राहिलेले आहेत ,पोलीसउपनिरीक्षक असल्याचा कधीही जाणवून दिली नाही .फोन करता क्षणी काही मिनिटांमध्येच घटनास्थळी पोहोचून मदत करणारे अधिकारी आहेत, असले अधिकारी आम्हाला मिळूच शकणार नाही. व येणारही नाही त्यामुळेच त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी गोरगरीब जनतेमध्ये जोर धरत आहे . असे अधिकारी मिळणे अशक्य आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपनिरीक्षक गोरखनाथ खरड यांची बदली रद्द करून जनतेला सहकार्य करण्याची विनंती मा.उपसरपंच संजय राजे निंबाळकर यांनी महाराष्ट्र न्यूज 10 च्या प्रतिनिधीशी व्यक्त केले आहे..

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close