महाराष्ट्र

राजेंद्र चौधरी अपात्र…..

फैजपूर

राजेंद्र चौधरी अपात्र
———————————-
फैजपुर / राजु तडवी
सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे विरुद्ध येथील सत्ताधारी भाजप पक्षाचे गटनेते अजय भारंबे यांनी दाखले केलेल्या एका तक्रार अर्जावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निकाल देताना राजेंद्र चौधरी यांना नगरसेवकपदी अपात्र घोषित केले आहे,

नगरसेवक अजय भारंबे यांनी दि ६ फेब्रुवारी २०२० रोजी एक तक्रार अर्ज माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता यात चौधरी यांनी सन २००१ ते आज पावेतो ते स्वत: नगरसेवक असून त्यांनी त्यांच्या पत्नी या सुद्धा नगरसेविका होत्या . सन २००६ ते सन २०११ पर्यंत नगराध्यक्षा देखील होत्या या काळात चौधरी यांनी आपले स्वताचे कुटुंबातील घराचे मालमत्ताकर कमी करण्यासाठी पालिकेचे मालमत्ता कर रजिस्टर मध्ये फेरफार करून कुठलीही कादेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता खाडाखोड करून कमी रकमेची आकारणी निर्धारित केली अशी तक्रार भारंबे यांनी केली होती,

या मालमत्तेत त्याचे आई सुमन श्रीकांत चौधरी, यांचे नावावरील मालमत्ता क्रमांक ४६१ याची सन २०११ मध्ये रेडीरेकनर नुसार १९०६ रुपये, एवढा कर निर्धारित केला होता तो ७३० रु एवढा केला, त्यांचे वडील श्रीकांत एकनाथ चौधरी यांचे नावावरील मालमत्ता क्रमांक २९ याचा कर २१६३ रु एवढा असताना तो ५८० एवढा कमी केला, तसेच दुसरी एक मालमत्ता क्रमांक १६३ याची सन २००६ ते २०११ पंचवार्षिक कालावधीत एकत्रित कराची रक्कम ४४७० रुपये आकारणी केली आहे, या सर्व बाबतीत अजय भारंबे यांनी तक्रार दाखल केली होती,

दरम्यान राजेंद्र चौधरी यांना देखील आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते त्यांनी आपले म्हणणे सादर करताना सन २००६ ते २०११ हा कार्यकाळ संपलेला असताना व तक्रार चालू कार्यकाळातील कामकाज बाबतची नसल्याने व तक्रार सद्यस्थितीच्या कार्यकाळा बाबत नसल्याने आक्षेप चुकीचा असून सदर तक्रार खोट्या माहितीच्या आधारे दाखल केल्याचे म्हटले होते,

दरम्यान जळगांव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि ७ रोजी याबाबत निर्णय देताना सदर नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना अपात्र करीत असल्याचा निर्णय दिला, दरम्यान या निर्णयाने सावदा येथील राजकाणात एकच खळबळ उडाली आहे, तर या निर्णया विरोधात आता राजेंद्र चौधरी काय पवित्रा घेतात याकडे देखील आता सावदावासीय नागरिकांचे लक्ष लागले असून, एकूणच सत्ताधारी विरुद्ध अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यातील वाद आता न्यायालया पर्यंत रंगणार अशी चिन्हे आहेत.

राजेंद्र चौधरी हे अपक्ष निवडून आले होते.ते या पंचवार्षिक पासून नगरपालिकेत तिकीट न मिळाल्या मुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर विरोधक झाले तर आ . गिरीश महाजन यांचे समर्थक मानले जातात . या पार्श्वभूमिवर , राजेंद्र चौधरी यांच्या अपात्रतेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

SHARE

16 Comments

 1. You made some clear points there. I looked on the internet for the subject matter and found most individuals will consent with your blog. Ronalda Vaughan Herod

 2. Wonderful blog! I found it while searching on Yahoo News.

  Do you have any suggestions on how to get listed in Yahoo News?
  I’ve been trying for a while but I never seem to get
  there! Thank you

 3. Superb site you have here but I was curious about if you knew of any message
  boards that cover the same topics discussed in this article?

  I’d really love to be a part of group where I can get opinions from other experienced individuals
  that share the same interest. If you have any recommendations, please
  let me know. Kudos!

 4. Greetings from Idaho! I’m bored at work so I decided to check out your blog on my iphone during lunch break.
  I really like the information you provide here and can’t
  wait to take a look when I get home. I’m shocked at
  how fast your blog loaded on my mobile .. I’m not even using WIFI,
  just 3G .. Anyhow, very good blog!

 5. A lovely cover and I enjoyed the synopsis and excerpt, this sounds like a must read for me. Thank you for sharing the book and author details. Nora Damiano Pollard

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close