महाराष्ट्र

आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून बेलवली, दत्त चौक ते समर्थ चौक, बॅरेज रोड उड्डाणपुलासाठी पाहणी

ठाणे

आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून बेलवली, दत्त चौक ते समर्थ चौक, बॅरेज रोड उड्डाणपुलासाठी पाहणी

प्रतिनिधी:- संजय कदम

बदलापूर पश्चिम बाजारपेठ रस्त्यावरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब ह्यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार निधीतून दत्त चौक जवळील सावंत प्लाझा ते स्वामी समर्थ चौक बॅरेज रोड इथपर्यंत सुमारे १४०० मीटर लांबीचा उड्डाणपूल करण्याबाबत आज एम एम आर डी ए चे अधिकारी व कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेचे नगररचनाकार विभागाचे अधिकारी यांनी आज संयुक्त पाहणी दौरा केला. ह्या उड्डाणपुलामुळे बाजारपेठेतील वाहतुकीचा होणारा कोंडमारा थांबेल आणि रस्त्यावरून चालणाऱ्या सामान्य नागरिकांना देखील व्यवस्थित ये जा करणे शक्य होईल. या पाहणी दौऱ्या वेळी ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष राजन घोरपडे, भारतीय जनता पार्टीचे बदलापूर शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष गणेश भोपी, मा नगरसेवक हेमंत चतुरे, राष्ट्रीय आदर्श पुरस्कार विजेते विश्वनाथ पाटील सर यांच्या सह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. बदलापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमदार साहेबांनी सुरू केलेल्या कामाचा सपाटा यापुढे ही असाच चालू राहील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे सोशल मीडिया संयोजक मिलिंद धारवाडकर यांनी दिला

SHARE

5 Comments

  1. thank you for his online reviewer page maam.. it helps me a lot.. i hope i can pass the exam in just 1 take this coming may 03, 2015.. may the GOD bless you more maam!thank you so much.. appreciated. Tova Alonso Recor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close