महाराष्ट्र

स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे

श्रीरामपूर

स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे

नगरपालिके समोर जे जे फाऊंडेशनचे आंदोलन श्रीरामपूर (प्रतिनिधी)

शहराला नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात येणारे पाणी गेले काही दिवसापासून कुबट वास आणि बेचव येत असल्याने शहरवासीयांना शुद्ध आणि चांगला पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी जे.जे. फाउंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल नगरपालिके समोर आमरण उपोषण सुरू केले होते. दिवसभर झालेल्या उपोषणानंतर सायंकाळी नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी प्रकाश जाधव आणि पाणीपुरवठा विभागाचे राजेंद्र पाठे यांनी लवकरच शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर सदरचे उपोषण काही काळासाठी स्थगित करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून शहराला दूषित पाणीपुरवठा होत असून त्यामुळे शहरांमध्ये वेगवेगळे आजार उद्भवले आहेत. भविष्यामध्ये या माध्यमातून शहरांमध्ये साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून नगरपालिकेने तातडीने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, शुद्ध पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी जे.जे.फाऊंडेशन’तर्फे हे उपोषण करण्यात आले होते. आमदार लहू कानडे,आम आदमीपक्षाचे तिलक डुंगरवाल,आरपीआय, लहुजी सेना,अमन समाज पार्टी,एबीएस ग्रुप, अल् फतेह यंग पार्टी व इतर अनेक सामाजिक संघटनांनी या उपोषणास पाठिंबा दिला होता.आमदार लहू कानडे यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून पाणीपुरवठा संदर्भातली सर्व माहिती दोन दिवसात द्यावी. त्याचबरोबर पाणीपुरवठयात सुधारणा करावी अशी सूचना केली. दिवसभरात शहरातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उपोषणार्थिची भेट घेऊन त्यांच्या या मागणीला पाठिंबा दिला. सायंकाळी उशिरा पालिकेचे उपमुख्याधिकारी प्रकाश जाधव व पाणीपुरवठा विभागाचे राजेंद्र पाठे यांनी जोएफ जामदार यांची भेट घेऊन त्यांना लेखी आश्वासन दिले. त्यानुसार ज्या ठिकाणी पाईप लाईन मध्ये लिकेज असेल, जिथे अशुद्ध पाणीपुरवठा होत असेल तो भाग तातडीने दुरुस्त करण्यात येईल तसेच नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या लेखी आश्वासना नंतर काही दिवसांसाठी सदर चे उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा जोएफ जमादार यांनी केली. पालिकेने दिलेले आश्वासन पाळले नाही तर पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी तौफीक शेख, अजहर शेख मुन्ना पठान, अफरोज शाह, रियाज पठान,अरबाज कुरैशी,नरेंद्र लोढे,वासिम शेख, जसीम पठान,शोएब कुरैशी,सत्यम दिवटे,ईमरान शेख, मुजम्मिल शेख, समीर पठान, फरहान शेख, अमीर खान,आसिफ तंबोली, गुड्डू जमादार, शारूख शेख, जियान पठान,मोइज पठान, तल्हा शेख, मजहर कुरैशी, कुणाल आठवले,तबरेज शेख,अय्युब पठान,अल्तमश शेख, शादाब पठान, फैज़ान बागवान,दानिश पठान,जुबेर शाह,तनवीर शाह,फैजान शेख, सोनू सैय्यद, अरबाज़ खान,हुसेन मिर्ज़ा,अदनान कुरैशी,मजहर कुरेशी,बिलाल काकर,काविश पठान,
राकेश कापसे, रॉकी लोंढे, हनीफ पठान,बाळासाहेब बागुल, रईस शेख इत्यादी उपस्थित होते .

चौकट
पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ
शहरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर हे उपोषण करण्यात आलेले असताना पालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे व इतर ज्येष्ठ नगरसेवकांनी या उपोषणाकडे पाठ फिरवली. आदिक या तर पालिकेतच आल्या नाहीत. विरोधी गटाचे नगरसेवक पाण्याच्या प्रश्नावर फक्त राजकारण करतात मात्र उपोषण करण्याचे धाडस ते दाखवू शकत नाही. या महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेण्याची गरज होती अशी चर्चा उपोषण स्थळी सुरु होती .

SHARE

19 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close