निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा बालग्राम परिवाराच्या वतीने गौरव प्रतिमा देऊन केला निर्भीड पत्रकार संघाचा सन्मान…..
गेवराई

निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा
बालग्राम परिवाराच्या वतीने गौरव प्रतिमा देऊन केला निर्भीड पत्रकार संघाचा सन्मान…..
प्रतिनिधी :- गेवराई
मराठी अस्मितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने कोरोणाचा पार्श्वभूमीवर दर्पण दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
याविषयी सविस्तर माहिती अशी की,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन प्रति वर्षी दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो, मात्र यावर्षी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर निर्भीड पत्रकार संघाच्या गेवराई वतीने दर्पण दिन पत्रकार दिन साधेपणाने साजरा करण्यात आला.यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी गेवराई शहरातील जवळील असणाऱ्या पालख्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सहारा बालग्राम परिवाराच्या वतीने साहारा अनाथालयाच्या वतीने संचालक संतोष गर्जे यांनी निर्भीड पत्रकार संघाचा गौरव प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी निर्भीड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अमोल कापसे, तालुका उपाध्यक्ष शेख सलमान, तालुका कार्याध्यक्ष अशोक सुरासे, तालुका सचिव लक्ष्मण आहेर, शहराध्यक्ष शेख उस्मान, शहर उपाध्यक्ष राजेंद्र चोरमले, पत्रकार शेख अतिक,राष्ट्रवादीचे युवा नेते सय्यद एजाज,दादा घोडके,सहारा अनाथालाया चे संतोष गर्जे, शेख राजू, आदी उपस्थित होते.