औरंगाबादमहाराष्ट्र

विहामांडवा जनशक्ती ग्राम विकास पॅनलच्या प्रचाराचे नारळ फुटले.

विहामांडवा : प्रतिनिधी, महाराष्ट्र न्यूज.10, शेख सिराज

विहामांडवा जनशक्ती ग्राम विकास पॅनलच्या प्रचाराचे नारळ फुटले.

“तरुणांच्या पुढाकारामुळे ज्येष्ठ आजी-माजी उमेदवारांचे धाबे दणाणले”

विहामांडवा ही पैठण तालुक्यात सर्वात मोठी सतरा सदस्य असणारी ग्रामपंचायत आहे. याठिकाणी दोन पॅनल मध्ये सरळ लढत होत असून, महाविकास आघाडीच्या नावावर पॅनल बनवून सत्ता स्थापन करण्याच्या स्वप्न बघणाऱ्या ज्येष्ठ आजी-माजी सदस्यांना जनशक्ती ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनी दि.७ जानेवारी 2021गुरुवार रोजी नारळ फोडून दंड थोपटले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विहामांडवा ग्रामपंचायत चे निवडणुकीसाठी दोन पॅनल रिंगणात उतरले असून, एक पॅनल महा विकास आघाडी च्या नावाने तर दुसरा पॅनल जनशक्ती ग्रामविकास पॅनल च्या नावाने आपले नशीब आजमावत असून ही ‘काटो की टक्कर’ याप्रमाणे लढत होणार असल्याची चर्चा चालू आहे. परंतु जनताजनार्दन मतदार हे निश्चितच यावर्षी जनशक्ती पॅनलच्या उमेदवारांना कौल देऊन भरघोस मतांनी निवडून देण्याची चर्चा करीत असून ,महाविकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवारांना शह देणार आहे. कारण आज पर्यंत अनेक वर्षापासून एकमेकाच्या विरोधात कट्टर विरोधक असणारे, एकमेका विरोधामध्ये नाही ते बोलणारे, आज एकच पॅनल मध्ये येऊन वारसा प्रमाणेच ग्रामपंचायत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये या जुन्या आजी-माजी उमेदवाराच्या विषयी वेगवेगळ्या चर्चेला उधान आलेले आहे. वर्षानुवर्षे हेच उमेदवार का,? आपल्याच परिवारातील, आपल्याच विचाराच्या उमेदवारांना संधी कशामुळे दिली जाते.? यांना बाहेरचा नवीन सुशिक्षित उमेदवार का चालत नाही?. अशा अनेक संशयाचा डोंगर मतदारांसमोर उभा राहिला असल्यामुळेच, या ग्रामस्थांनी जनशक्ती ग्रामविकास पॅनल मधील तरुण सुशिक्षित , निर्व्यसनी ,विशेष ज्यांच्याकडे वेळ , पैसा ,बुद्धिमत्ता, काम करण्याचे कौशल्य असल्यामुळे कौल दिलेला आहे. जनतेने तरुणांना जास्त पसंती दिल्यामुळे ,आज पर्यंत अनेक वर्षापासून दुसऱ्यांना ग्रामपंचायत कळु न देणाऱ्या ज्येष्ठ आजी-माजी उमेदवारांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. विहामांडवा येथील कुलदैवत असणारे लक्ष्मी मातेचे मंदिरामध्ये जनशक्ती ग्रामविकास पॅनल च्या सर्व उमेदवारांनी नारळ फोडून प्रचारामध्ये मुसंडी मारली आहे, यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांसह मा.उपसरपंच संजय राजे निंबाळकर, मा.सरपंच अफसर भाई मास्टर, मा. उपसरपंच मुकेश काला, युवा शिवसैनिक शकील शेख , समाजसेवक नितीन ब्रह्मराक्षस यांच्यासह उमेदवार बांधव व गावातील शेकडो नागरिकांचीउपस्थिती होती.
“विशेष”
मला लॉकडाउनच्या च्या काळामध्ये मिळालेल्या सरपंच पदाच्या संधीमध्ये लाखो चे काम केले आहे. त्या अल्पवधिमध्ये लॉक डाऊन लागले नसते तर ,गावामध्ये विकासाची गंगा वाहून आणली असती, परंतु कार्यकाळ संपला.जनता जनार्दनाने परत संधी द्यावी विकास कामे कशी असते हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,
मा.सरपंच
अपसर भाई मास्टर.

SHARE
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close