महाराष्ट्र

शाळा वाहन व घर कर्जावरील व्याज माफ करणे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना अन्वर सय्यद यांचे निवेदन..

पुणे

कोराना कालावधीमधील व्यवसाय बंद असलेल्या शाळांमधील बस चालक वाहन चालक मालकांना शाळा वाहन व घर कर्जावरील व्याज माफ करणे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

दहा महिन्यापासून शाळा बंद आहेत शाळेत येणाऱ्या पैशातून आपले संसार चालवणारे व आयुष्यभर इमानदारीने वेळेला महत्व देत इतरांच्या मुलांना वेळच्या वेळी शाळेत व घरी पोहोचवनारे असे सामान्य जीवन जगणारे सकाळी पहाटे उठून ते राष्ट्र प्रगतीचे मशाल हाती घेऊन इतरांच्या मुलांना जिवापार सांभाळणारे शाळा वाहन चालक मालक आज आपले जीवन खुप हलाखीत जगत आहेत
आजवर शाळा वाहन चालकांनी कधीच बंद पुकारलेला नाही किंवा मुलांच्या पालकांना वेठीस धरलेले नाही परंतु आज दुर्दैवाने ते बरेच अडचणीत अडकले आहेत

बँकांनी त्यांना कर्ज द्याना अगोदर इन्कम सोर्स इन्कम टॅक्स ह्या सर्व अटी माहिती करून घेऊनच कर्ज दिलेले असणार व त्या बँकांना सुद्धा माहीत असणारच आहे ज्या शाळा वाहनचालकांनी कधीच हप्ते बुडवले नाहीत आज नाइलाजने ते वाहनाचे हप्ते घरच्या हप्ते भरू शकत नाहीत शाळा सुरू होईपर्यंत बँकांनी शाळा वाहनचालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये व उच्च शिक्षणासाठी शाळा वाहनचालकांच्या पाल्यांना ऍडमिशन साठी शाळा सुरू झाल्याच्या पुढील किमान सहा महिने उच्च शिक्षण संस्थांनी सवलत द्यावी

अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अन्वर सय्यद यांनी केली आहे

SHARE
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close