औरंगाबाद

आम्ही आश्वासने न देता,प्रत्यक्षात कामे करणार, (मुकेश सेठ, संजय राजे, अपसर भाई)

विहामांडवा: प्रतिनिधी,महाराष्ट्र न्यूज 10 ( शेख सिराज )

विहामांडवा,

आम्ही आश्वासने न देता,प्रत्यक्षात कामे करणार, (मुकेश सेठ, संजय राजे, अपसर भाई)

विहामांडवा ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण सध्या तापलेले आहे , ज्येष्ठ आजी-माजी उमेदवारावर ग्रामस्थ नाराज असून यांच्याविरोधात तरुण युवा पिढीने जास्त सहभाग घेतल्यामुळे ही निवडणूक ज्येष्ठ आजीमाजी उमेदवारासाठी डोकेदुखीची ठरणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 17 सदस्य असणारी ही ग्रामपंचायत अनेक वर्षापासून पैठण तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत आहे. कारण याठिकाणी तालुक्यामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ असून दिवसभरामध्ये लाखोच्या व्यवहाराची उलाढाल होत असून व्यापाऱ्यांना एकच बँक असल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच येथे प्राथमिक आरोग्य केंद्र हे शोभेची वास्तू झालेली आहे. येथील नागरिकांचे आरोग्य नेहमी घाणीच्या साम्राज्यात मध्येच चाललेले आहेत, याठिकाणी अनेक डझनभर समस्या उद्भवल्या आहेत, या समस्या सोडवण्यासाठी आज पर्यंत येथील ग्रामपंचायत उमेदवारांनी पाठ दाखवल्याचे चित्र निर्माण झालेले आहेत, ग्रामपंचायत मध्ये निवडून येणारे आत्तापर्यंतचे उमेदवार हे निवडून येई पर्यंतच शिक्षणाविषयी आरोग्य विषयी मोठमोठे आश्वासने देत गेलेले आहेत. परंतु त्यांनी गाजर दाखवण्याचे चित्र निर्माण झालेले आहे, निवडून आल्यानंतर येथील मतदार बांधव निवडून दिलेल्या उमेदवाराकडे तक्रार घेऊन गेले असता. त्यांना कधीही समाधान कारक उत्तर मिळाले नाहीच ,परंतु समस्येचे निराकरण झालेले नाही, या सर्व गोष्टीला नागरिक कंटाळलेले असल्यामुळे ,जनशक्ती ग्रामविकास पॅनल च्या माध्यमातून तरुण निर्व्यसनी उमेदवारांनी सहभाग घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासने दिले आहेत. हे निर्व्यसनी उमेदवार असल्यामुळेच मतदार राज्यांनीही यांना भरभरून प्रतिसाद दिल्याचे चित्र बघायला मिळत आहे, स
ध्या मते घेण्यासाठी प्रत्येक वर्गामध्ये बलाढ्या उमेदवारांनी स्वखर्चाने ही काम करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे, परंतु हे चित्र निवडून येईपर्यंतच असेल ,असे ज्येष्ठ मतदार राजाकडून ऐकावयास मिळत आहे. हे पैसे वाले उमेदवार पैशाच्या बळावर निवडणूक लढवीत आहेत, परंतु निवडून आल्यानंतर हेच उमेदवार आपली खळगी भरून काढतील, अशीही मतदार राजाच्या मुखावाटे उदगार निघत आहे. जो इच्छेने ,पैशाचे आमिष न दाखवता, कोणतेही आमिष दाखवता, जो उमेदवार निर्व्यसनी आहे अशाच उमेदवारांना निवडून देण्याची भाषा मतदार राजा करीत आहे.
विशेष… ‌
जनशक्ती पॅनल मध्ये आम्ही शिक्षका सारखे उमेदवारांना संधी दिलेली आहे, कारण शिक्षक हा चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम करीत असतो ,आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवूनच उमेदवारी दिलेली आहे. आम्ही मतदारांना भूलथापांना न देता, पोकळआश्वासने न देता, भूतो ना भविष्य अशा प्रकारची विकास कामे करणार आहोत, त्याकरिता मतदार राजांनी शिक्षका सारखे उमेदवारांना संधी दिली तर आम्ही मतदार राजाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
उद्योगपती,
मुकेश सेठ काला,
राष्ट्रमात जिजाऊ विद्यालय संस्थापक.संजय राजे निंबाळकर,
मा.सरपंच अफसर शेख (मास्टर)

SHARE
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close