औरंगाबादमराठवाडामहाराष्ट्र

पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यचे सिल्लोड तालुका अध्यक्ष पदी शेख नदीम

सिल्लोड

पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यचे सिल्लोड तालुका अध्यक्ष पद शेख नदीम शेख फहीम यांची निवड

सिल्लोड प्रतिनिधी – औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा लेणी व्ह्यू पॉईंट येथे प्रजासत्ताक दिन निमित्त पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ची बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये मराठवाडा, अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सिल्लोड तालुका अध्यक्ष पद बिनविरोध निवड करण्यात आले.तर शैक्षणिक तथा पञकारीतेत कार्यरत असणारे मुक्त पञकार शेख नदीम शेख फहीम यांची पत्रकार सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामनाथ जराडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व
अजिंठा लेणी व्ह्यू पॉईंट येथे सर्व जिल्ह्यातील पत्रकार यांचा सत्कार करण्यात आले व त्यांना पत्रकार सेवा संघ चे नियुक्ती पत्र व ओळख पत्र वाटप करण्यात आले यावेळी मराठवाडा अध्यक्ष सुनील वैध मराठवाडा जिल्हा अध्यक्ष रविंद्र सुरडकर जिल्हा व अरुण चव्हाण, गणेश कोलते, नईम शहा, इल्यास कुरेशी, मुजीब शेख, शेख मुशर्रफ, सलीम कुरेशी,राजू दांडगे सर्व उपस्थित होते.
व मराठवाडा अध्यक्ष सुनील वैद्य तसेच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रवींद्र सुरडकर यांनी व जिल्हा उपाध्यक्ष मोसिन शेख यांच्या शिफारशीनुसार शेख नदीम यांना सिल्लोड तालुका समन्वयकपदाचे ओळखपत्र देऊन निवड केली आहे.
शेख नदीम हे सिल्लोडमध्ये शैक्षणिक, सामाजिक , पञकारीता, कला आदी क्षेत्रात कार्यरत असून गुणवत्ता आणि कार्यक्षमता पाहून त्यांची नियुक्ती केली आहे ,असे पञात नमूद केले आहे.सिल्लोड तालुक्यातील विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close