पश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई

रात्रीच्या गडद अंधारात मीरा रोड स्फोटाने हादरले.

मुंबई

रात्रीच्या गडद अंधारात मीरा रोड स्फोटाने हादरले.
=========================
दिनांक ०८/०२/२०२१
काल मध्यरात्री २.०० च्या सुमारास गडद अंधारात मीरा रोड स्फोटाने हादरून गेले आहे.मध्यरात्री २.॰॰ वाजण्याच्या सुमारास मीरा रोड परिसरातील राम नगर मधील शांति गार्डन,सेक्टर क्रमांक ५ येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या दोन सिलेंडरच्या ट्रकमध्ये सिलेंडरचे स्फोट झाले.आजुबाजुला दोन सिलेंडरने भरलेल्या गाड्या उभ्या होत्या.रात्री गाढ झोपेत असणारे रहिवासी या स्फोटामुळे पुर्णपणे हादरून गेले आहेत. सदर सिलेंडरला आग लागून झालेला स्फोट एवढा प्रचंड होता की त्यामुळे सदर परिसरात असणार्या घरांच्या काचा फुटल्या.सिलेंडरचा पत्रा तसेच गाडीचा पत्रा बाजूला असणार्या सोसायटीच्या आवारात पडला.सिलेंडरचा उडालेला पत्रा लागून एक नागरिक जखमी झाला आहे. त्याला तात्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सदर सिलेंडरच्या झालेल्या भिषण स्फोटानंतर ताबडतोब मिरा – भाईंदर मधील अग्निशमन दलाच्या सात अग्निशमन गाड्या , दोन टँकर ,एक टिटीएल गाडी त्याचप्रमाणे ५४ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले पहाटे ३:०० च्या सुमारास प्रयत्नांची शर्थ करून स्फोटामुळे लागलेली आग संपुर्ण आटोक्यात आणली.अर्ध्या किलोमीटर वरून अग्निशमन दलाचे जवान शीडीवरून पाण्याचा सतत मारा करत होते. तसेच ट्रकमधील लिकेज सिलेंडर शोधण्याचे काम सुरू आहे.
=========================
भुषण प्र. कुंडईकर (मुक्त पत्रकार/ मुंबई प्रतिनिधी)

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close