महाराष्ट्र

माळवाडगाव येथे महावितरणची बैठक शेतकरी संघटनेने उधळली

श्रीरामपूर

माळवाडगाव येथे महावितरणची बैठक शेतकरी संघटनेने उधळली

श्रीरामपूर प्रतिनिधी -इमरान शेख

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे आज सकाळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कृषी पंप विज धोरण 2020 संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र ही बैठक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की माळवाडगाव येथे आज (दि.१०) रोजी सकाळी १० वा.येथे महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी ५० टक्के वीज बिल भरणा करण्या संदर्भात माहिती देण्यासाठी आले होते त्याचा शासकीय कार्यक्रम माळवाडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात स्पीकर लाऊन बैठक व्यवस्था करुन सुरू होणार होता नेमके त्याच वेळी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे शरद आसने व तंटामुक्ती अध्यक्ष सुदामराव आसने दोन दिवसांपूर्वी गावातून शेतकर्यीची फसवणूक करून पळून गेलेल्या व्यापारी संदर्भात चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात येत होते. गाव शोकसागरात बुडाले असताना अचानक असा कार्यक्रम घेऊ नका, आमची अगोदरच महावितरण ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करा, शाॅर्टसर्किट मुळे जळालेल्या ऊस उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी तसेच आधी लाईनवर असलेल्या तक्रारी प्रत्यक्ष बघायला चला आशा मागण्या गावकर्याच्या वतीने करण्यात आल्या त्यावर तयारी न दाखविल्या मुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व गावकरी यांनी नियोजित बैठक न घेता आले़ल्या अधिकार्यांना धारेवर धरुन माघारी पिटाळून लावले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अगोदर गावात असलेल्या तक्रारींचे निरसन करावे आणि नंतरच या ठिकाणी बैठक आयोजित करावी आमचा व्यक्तिगत महावितरण अशी कोणताही वाद नाही मात्र महावितरणने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करावे महावितरणने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि त्यानंतर या ठिकाणी बैठक आयोजित केल्यास या बैठकीला शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते देखील उपस्थित राहतील असे यावेळी पत्रकारांशी बोलताना शरद आसने यांनी सांगितले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close