महाराष्ट्र

राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अहमदनगर येथे महापालिका व नगरपरिषदा यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

श्रीरामपूर

राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अहमदनगर येथे महापालिका व नगरपरिषदा यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

श्रीरामपूर प्रतिनिधी -इमरान शेख

यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार लहू कानडे यांनी उपस्थित राहून श्रीरामपूर मतदार संघातील श्रीरामपूर व देवळाली प्रवरा नगरपरीषद यांच्या साठी आवश्यक त्या रस्ता दुरुस्तीसाठी नगर विकास मंत्री यांनी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून लेखी निवेदन दिले. यामध्ये श्रीरामपूर नगरपरिषद परिषदेसाठी 24 कोटी तर देवळाली नगरपरिषदेसाठी सात कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ दोन कोटी रुपये प्राप्त झाल्या कडे आमदार लहू कानडे यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. सभेतील चर्चेमध्ये सहभागी होताना आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर येथील विस्तीर्ण अशा पाणी साठवण तलावाला आच्छादन नसल्याने गाळमिश्रित पाणी श्रीरामपूरकरांना प्यावे लागते. त्यासाठी नगर विकास विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच घनकचरा यावर वेगाने प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत असा प्रश्न उपस्थित केला. सदर चे प्रश्न सोडवण्यासाठी नगर विकास विभागाने सर्वतोपरी सहकार्य करावे अशी मागणी मंत्री महोदयआंकडे केली.
नगर विकास मंत्री नामदार शिंदे साहेब यांनी नवीन नगररचना नियमावली व नगरपालिका कामकाजाची माहिती देण्यासाठी सर्व नगर पालिकेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. नियोजन भवण अहमदनगर येथे मंत्र्यांचे आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन आमदार लहू कानडे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये नामदार शिंदे यांचे स्वागत केले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close