
क्लीन सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी कंपनीने सीएसआरफंडातून उभारला पाणी फिल्टर प्लँट
दौंड:- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील क्लीन सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने सीएसआर फंडाच्या माध्यमातून कुरकुंभ गावच्या नागरिकांना शुद्ध पाणी फिल्टर प्लँट उभारला आहे . त्यामुळे कुरकुंभकरांना आता एक रुपयात चार लिटर व पाच रुपयात वीस लिटर अशा नाममात्र दरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. यावेळी कंपनीचे संचालक कृष्णकुमार बूब आणि कुरकुंभचे सरपंच आयुब शेख यांच्या हस्ते सोमवारी ( दि . १७ ) रोजी या प्लँटचे उद्घाटन करण्यात आले . कुरकुंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ तीन लाख रुपये किमतीचा हा पाणी फिल्टर प्लँट उभारला आहे. या माध्यमातून प्रतितास एक हजार लिटर पाणी शुद्ध होईल. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक विठ्ठल थोरात, उपसरपंच विनोद शितोळे , पोलिस पाटील रेश्मा विनोद शितोळे , ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भागवत , विजय गिरमे , उमेश सोनवणे , ग्रामसेवक संदीप ठवाळ , माजी सरपंच रशिद शेख, रफीक शेख, नवनाथ गायकवाड , माजी उपसरपंच सुनील पवार , नीलेश भागवत , राजू दोडके व ग्रामस्थ उपस्थित होते .
*गेली अनेक वर्षांपासून या परिसरात बोरवेल विहिरींना दूषित पाणी असल्याने येथील नागरिक अतिरिक्त दराने पाणी घेत होते परंतु या क्लीन सायन्स कंपनीने पुण्य चं काम करून गावाला फिल्टर शुद्ध पाणीपुरवठा करून दिल्याबद्दल आम्ही कंपनीचे आभारी आहे*
सरपंच ,आयुब शेख.
आम्ही कंपनीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत आहोतच यापुढेही कंपनीच्या माध्यमातून असे कार्य करत राहणार
विठ्ठल थोरात
व्यवस्थापक
क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी