नाहाटा महाविघालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन..

राजु तडवी फैजपुर

भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयतील मराठी विभाग आणि मानसनीती व समाजशास्त्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ.ए.डी. गोस्वामी यांनी अध्यक्षस्थानी होते . डॉ. गोस्वामी यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नव्हते. ते संवेदनात्मक लोकशाही कट्टर पुरस्कर्ते होते . स्वातंत्र, समता आणि बंधुत्व या तत्वानी अविरतपणे जीवन जगण्याचा मार्ग दाखविला तसेच राजकीय, सामाजिक, वैचारिक, आर्थिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.के. राठोड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध गुरु असून त्यांच्या तत्वज्ञानाच्या कार्यामुळेव्यक्तिमत्व बहुआयामी होते . मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. के के अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय साठी एक आइडल आहेत . भारताची राज्यघटना एका व्यक्तीची, जातीची, धर्माची नाही तर ती सर्वसमावेशक आहे . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. व्ही ए सोळुंके यांनी पुरोगामी विचारवंत समजून घ्यायचे असतील तर पुरोगामी विचाराचे असले पाहिजे. तसेच उपभोकत्यानं विवेकशील असावे हे मत मांडले.प्रा. वंदना महाजन-नेमाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचे विचार व कार्याचा परामर्श घेतला.प्रा. प्रतिभा गलवाडे यांनी डॉ.बाबासाहेबांचा दूरदृष्टीकोण मांडला. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. एम व्ही वायकोळे, उपप्राचार्य प्रा. एस.व्ही. पाटील,उपप्राचार्य प्रा. डॉ. बी.एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए.डी. गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.डॉ. एन.ई.भंगाळे यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रा. पुरुषोत्तम महाजन यांनी केले. आभार प्रा. गौतम भालेराव मानले यावेळी. प्रा. डॉ. जे.एफ. पाटील,डॉ. एस.पी.झनके,डॉ. पी.ए.अहिरे,प्रा.एस.टी.धूम,डॉ. आर.एस.नाडेकर,डॉ. डी.एम टेकाडे, डॉ. स्मिता चौधरी, डॉ. प्रफुल्ल इंगोले, प्रा. ए.पी. नवघरे, प्रा. डॉ.निनू झोपे,डॉ. किरण वारके,डॉ. दीनानाथ पाठक, डॉ. दीपक शिरसाठ, डॉ.मनोज पाटील,डॉ. राजेंद्र तायडे, डॉ ललित तायडे, डॉ. सचिन राजपूत,प्रा. अजय तायडे प्रा. कौस्तुभ पाटील,प्रा. केंद्रे सर, डॉ. स्वाती महाजन,प्रा. भारती सोनवणे,प्रा. कविता पांडव, प्रा. प्रियंका महाजन,प्रा. योगिता भंगाळे,प्रा. उज्वला महाजन,प्रा. मुग्धा भालेराव . आदी होते.

2 thoughts on “नाहाटा महाविघालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!