शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..

शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या आरोपीस शेवगाव पोलीसांनी केले गजाआड

दिनांक- 26/02/2025 या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. 148/2025 फिर्यादीडनुसार काल दिनांक 25 फेब्रुवारी मंगळवारी आरोपी गणेश नवनाथ घोरतळे वय 22 वर्षे रा. मारुती वस्ती बोधेगाव ता. शेवगाव यांचे विरुध्द एन डी पी एस अधिनियम 1985 चे कलम 8(b), 18 प्रमाणे दिनांक- 25/02/2025 रोजी 11 वाजुन 45 मि.च्या सुमारास शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेले अफुच्या झाडाची बोधेगाव शिवारात ईसम नामे गणेश नवनाथ घोरतळे यांनी त्यांचे शेतामध्ये बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत माहीती पोनि समाधान नागरे यांना मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पंचासह जावुन छापा टाकला असता गणेश नवनाथ घोरतळे याचे मालकीची गट नं. 451 मध्ये अंदाजे चार गुंठे क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेले अफुच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याचे मिळुन आल्याने सदर मुद्देमालाचा जागीच पंचनामा करुन त्यामध्ये अफुची ची 953 लहान मोठी झाडे त्यास बोंडे असलेली वजन 39.685 किलो असुन त्याची बाजारातील किंमत अंदाजे 11,43,600/- असा मुद्देमाल मिळुन आला आहे.
तरी दिनांक 25/02/2025 रोजी सायंकाळी 05. वाजता चे सुमारास बोधेगाव ता. शेवगाव शिवारातील शेती गट 451 मध्ये संशयित आरोपी गणेश नवनाथ घोरतळे वय 22 वर्षे धंदा शेती रा. मारुती वस्ती बोधेगाव ता. शेवगाव जि.अहिल्यानगर हा त्याचे मालकीचे शेतात वरिल वर्णनाचा आणि किंमतीचा महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करुन वाढविलेल्या स्थितीत मिळुन आली त्याचेवर शेवगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्यामध्ये गणेश घोरतळे यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाब तालुक्याचे धडाकेबाज पो.नि. समाधान नागरे, सपोनि धरमसिंग सुंदरडे, सपोनि अशोक काटे, पो.हे.कॉ. चंद्रकांत कुसारे, पो.हे.काँ. किशोर काळे, पो.कॉ. शाम गुंजाळ, पो.कॉ. संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पो.काँ. भगवान सानप, पोकाँ प्रशांत आंधळे, पोकाँ एकनाथ गर्कळ, पोकाँ संपत खेडकर, मपोकाँ प्रियंका निजवे तसेच सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथील पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास सहा पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे शेवगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!