
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव नेत कौशल्य प्रशिक्षणास प्रारंभ..
भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने मा.आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील, डॉ. क्षितिज घुले पाटील व संस्थेचे विश्वस्त यांचे मार्गर्शनाखाली कार्यरत असून भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे अंतर्गत, भारतीय कृषि कौशल्य परिषद यांच्या माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने ता.शेवगाव, जि.अहमदनगर यांचेद्वारे ग्रामीण भागातील युवक व शेतकऱ्यांसाठी लघु सेंद्रिय उत्पादक व लघु दुग्ध व्यवसाय या शेती पुरक उद्योग उभारणीकरिता २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्राचे प्रमुख डॉ. एस.एस. कौशिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी केंद्राचे विषय विशेषज्ञ नारायण निबे डॉ. चंद्रशेखर गवळी, सचिन बडधे व प्रविण देशमुख हे उपस्थित होते. यावेळी बोलताना ग्रामीण भागातील तरुणांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक व्यवसाय उभारणी करण्याची सुवर्ण संधी असल्याचे डॉ. कौशिक यांनी सांगितले. कौशल्य विकास प्रशिक्षण दि.६ ते ३० मार्च दरम्यान असून यात ५० तरुण शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असल्याचे श्री. नारायण निबे यांनी सांगितले. प्रशिक्षण पूर्ण झालेनंतर भारत सरकारचे वतीने प्रमाणपत्र देण्यात येईल त्याचा वापर शासकीय अनुदान व बँक कर्ज यासाठी करता येईल. असे डॉ. गवळी यांनी सांगितले.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर प्रशिक्षणार्थी ची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बडधे तर आभार नारायण निबे यांनी मानले.