
अज्ञाताने कांदा चाळ पेटवून दिली; ५५ टन कांदा जळून खाक : शेतकऱ्याचे तब्बल नऊ लाखाचे नुकसान
अज्ञाताने कांदा चाळ पेटवून दिली; ५५ टन कांदा जळून खाक : शेतकऱ्याचे तब्बल नऊ लाखाचे नुकसान
दौंड प्रतिनिधी आलिम सय्यद
:- दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील एका शेतकऱ्याच्या कांदा वखारीला ( चाळीला ) अज्ञात व्यक्तीने आग लावली. यामध्ये शेतकऱ्याचे अंदाजे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे .चाळीत एकूण ५५ टन कांदा होता.
एकीकडे शेतीमालाला भाव नाही,
दुसरीकडे कोरोनाचा कहर या चक्रात अडकलेल्या कांदा उत्पादक शेतकरी नाना वसंत जगताप राहणार कासुर्डी ( कामठवाडी)ता.दौंड जिल्हा पुणे यांच्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने आग लावली. यामध्ये ५५ टन कांदा होता. प्रशासनाने लावलेल्या संचारबंदीत कांद्याला भाव नाही विक्री व्यवस्थाही विस्कळीत झाल्याने जगताप यांनी कांदा वखारीत साठवून ठेवला होता.काही दिवसांनी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने कांदा वखारीत ठेवला होता.या साऱ्या कांद्याच्या घडामोडींवर मात करत कासुर्डी कामठवाडी येथील शेतकरी
नाना जगताप यांनी दोन पैसे मिळतील या आशेपोटी कांदा वखारीत लावून ठेवला होता.
परंतु दिनांक ७ मे रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घराजवळ अवघ्या सहासे फूटावर असलेली कांद्याची वखार अज्ञात इसमाने पेटवून दिल्याने जगताप यांचे मोठे नुकसान झाले आहे. चाळीला आपोआप आग लागण्याची शक्यता नाही कोणी तरी विकृत व्यक्तीने हे कृत्य केल्याचा संशय आहे अशी तक्रारही जगताप यांनी यवत पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंडल अधिकारी दिपक कोकरे,कृषी सहायक अधिकारी स्नेहल थेऊरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.या विकृतीचा कासुर्डी कामठवाडी परीसरात शेतकऱ्यांकडून अशा मनोवृत्ती चा जाहीर निषेध होत आहे.
[ आर्थिक मदतीची अपेक्षा-
लॉकडाऊन काळात कांद्याला भाव नाही दुसरीकडे कोरोनाचा कहर चालू असतानाच शेतकरी नाना जगताप यांनी साठवून ठेवलेला कांदा अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने मातीमोल ठरला आहे.नऊ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने जगताप हे पूर्ण हतबल झाले आहेत जगताप यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची अपेक्षा ठेवली आहे ]