मनोज बाजपेयीचा पुरस्कार विजेता थरारपट “जोरम”चा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर अॅन्डएक्सप्लोरएचडी वाहिनीवर

मनाची पकड घेणारा आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा थरारपट “जोरम” हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज असून ह्या चित्रपटाचा दीर्घ प्रतीक्षेतील वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर 22 जून रोजी रात्री 9 वाजता अॅन्डएक्सप्लोरएचडी वाहिनीवर करण्यात येणार आहे. नावाजलेले फिल्ममेकर देवाशिष मखिजा यांनी दिग्दर्शित केलेला आणि हरहुन्नरी अभिनेता मनोज बाजपेयी यांची भूमिका असलेला “जोरम” हा एक पुरूष आणि त्याच्या बाळाची भयानक कथा मांडतो. त्याच्या भूतकाळाची भूते आणि तो मरावा अशी इच्छा असलेल्या वाईट ताकदी मागे लागलेल्या असताना जीवंत राहण्याची त्यांची धडपड यातून पाहायला मिळेल.

कुशल कथाकथन आणि मनोज बाजपेयीचे जबरदस्त प्रदर्शन ह्या कथानकामध्ये जीव ओततो आणि प्रेक्षकांना भावना आणि गूढाच्या रोलरकोस्टर सफरीवर घेऊन जातो. जसजशी ही कथा उलगडत जाते तसतसे प्रेक्षक गूढ, रहस्य आणि नैतिक दुविधेच्या दिशेने खेचले जातात आणि अखेरपर्यंत आपल्या खुर्चीला अक्षरशः खिळून राहतात.

आपल्या मुलीला धोक्यापासून वाचवताना आपण पकडले जाऊ नये म्हणून कथेतील नायकाच्या संघर्षाचा पाठपुरावा करताना हा चित्रपट अनिश्चितता आणि धोक्यांचे तीव्र चित्र रंगवतो. झारखंडमधील आदिवासी समुदायाच्या पार्श्वभूमीवरील “जोरम” हा हृदयाच्या तारा छेडत परस्पर सामाजिक भाष्यासह उपेक्षित लोकसंख्यला सामोरे जावे लागणाऱ्या भीषण वास्तवावर प्रकाश टाकतो.

अनरूटिन, अनएक्सपेक्टेड आणि अनफॉर्म्युला चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी प्रस्तुत करण्यासाठी अॅन्डएक्सप्लोरएचडी वाहिनी मानली जाते. ही वाहिनी असाच आणखी एक उत्तम चित्रपट “जोरम” घेऊन येत असून ह्या चित्रपटाने आपल्या मनाची पकड घेणारे कथानक आणि सामाजिक समस्यांना अतिशय भेदक पद्धतीने मांडल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि पुरस्कार मिळवले आहेत. अॅन्डएक्सप्लोरएचडी वाहिनीवर ह्या चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरसह हा चित्रपट विस्तृत स्तरावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि निश्चितपणे याबद्दल चर्चा घडून येतील.

गुणी अभिनेता मनोज बाजपेयी म्हणाला, “‘जोरम’वर काम करणे हा माझ्यासाठी एक सखोल व्यक्तिगत प्रवास ठरलेला आहे. हा चित्रपट अतिशय बारकाईने उपेक्षित समुदायांना सहन कराव्या लागणाऱ्या वास्तविकतांना मांडतो. मी स्वतः एका छोट्‌या गावात लहानाचा मोठा झालो आहे त्यामुळे मी ही परिस्थिती नीट समजतो. हे कथानक आणि त्यातील व्यक्तिरेखांसोबत मी अगदी खोलवर जोडला गेलो आणि त्यामुळे ह्या प्रोजेक्टसाठी मी माझा संपूर्ण प्रयत्न केला. ‘जोरम’ करत असलेल्या दुर्बळ आणि असुरक्षितांच्या संघर्षाचे अविचल चित्रणाकडे मी ओढला गेलो. उपेक्षित समुदायांतर्फे सहन करण्यात येणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सिनेमाच्या ताकदीच्या माध्यमातून त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्याची एक संधी म्हणून मी ह्या चित्रपटाकडे पाहिले. ही एक अशी कथा आहे जी सांगितली गेली पाहिजे आणि मला अभिमान आहे की अॅन्डएक्सप्लोरएचडी वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांना हा सगळा अनुभव घेता येणार आहे.”

दिग्दर्शक देवाशिष मखिजा म्हणाले, “शहरांमध्ये आपल्याला जे खास आयुष्य जगायला मिळते त्याला बहुतेकदा आपण गृहित धरतो आणि त्याचबद्दल ‘जोरम’मध्ये आम्ही काही कठीण प्रश्न विचारले आहेत. ह्या मनाची पकड घेणाऱ्या थरारक चित्रपटासह आम्ही जीवंत राहणे आणि मानवी चैतन्याचा चिवटपणा यांच्या संकल्पना उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अस्थायी विकासाच्या ध्यासाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या असमानता आणि अन्यायाबद्दल ‘जोरम’ आपल्याला आठवण करून देतो. आम्हांला आशा आहे की आमच्या चित्रपटाच्या विषयामुळे बदलाला समर्थन देण्यासाठी प्रेक्षकांना प्रेरणा मिळेल.”

तेव्हा पाहायला विसरू नका “जोरम”चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर अॅन्डएक्सप्लोरएचडी वाहिनीवर 22 जून रोजी रात्री 9 वाजता. यात तुम्हांला अनिश्चिततेचा गाभा आणि मानवी चैतन्याचा चिवटपणा यांमध्ये डोकावणारा एक संस्मरणीय प्रवास करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!