तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..

नेवासे शहर ता.04

अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

मुबंई येथे मा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार याच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले

यावेळी मा. कपिल पवार म्हणाले की अशोकराव मोरे यांच्या कडे तालुका अध्यक्ष पदाची धुरा आज सोपविण्यात आली आहे निश्चित पणे तालुक्यातील गोरगरीब जनतेला या पदाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य ते करतील व पक्षाचे संघटन वाढवतील.

मोरे यांच्या निवडी बद्दल आमदार संग्राम भैय्या जगताप, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाशजी आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अजितदादा कदम,जिल्हाउपाध्यक्ष अच्युतराव जाधव,
यांनी अभिनंदन केले आहे.

कोट–
पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वासास नक्कीच पात्र राहील पक्ष वाढी साठी भविष्यात काम करु जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पार पाडेल
अशोकराव मोरे
तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट)

कोट–
मुबंई येथे सदरील निवडीची माहिती समजताचं युवकांनी अंमळनेर येथे फटाके फाडून जल्लोष साजरा केला व अजित पवार गट पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार पेढे वाटप करण्यात आले यांच्या निवडीने तालुक्यात मोठी ताकत अजित पवार गटाची निर्माण झाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!