
दौंड पोलिसांची धडाकेबाज कारवाई चोरीच्या चार दुचाकी जप्त, चार गुन्हे उघडकीस तर एक आरोपी जेरबंद..
दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद
दौंड पोलीस ठाणेचे डी बी पथकाने धडक कारवाई करत मोटरसायकल चोरीतील एक आरोपी जेरबंद करत त्याचेकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत,जस्साराम पुसाराम चौधरी ( वय २६ ) मूळ राहणार बुटाटी ता. जायल, जि. नागवा, राजस्थान, सध्या रा. केडगाव ता. दौंड जि. पुणे , असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने सदरच्या दुचाकी कोंढवा, लोणी काळभोर, दौंड या भागातून चोरल्या असल्याची कबुली दिली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की दि.०७ डिसेंबर रोजी दौंड शहरातील नगर मोरी चौकातून एक दुचाकी चोरी झाले बाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने दौंड डी बी पथक तपास करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेत एक संशयिताला केडगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केलो असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचेकडून आत्तापर्यंत चार दुचाकी जप्त करण्यात डी बी पथकाला यश आले आहे. डी बी पथकाने मिळून आलेल्या इतर दुचाकी बाबत संबंधीत पोलीस ठाण्यांकडे चौकशी केली असता त्या ठिकाणी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.सदर आरोपीने आणखी वाहने चोरली आहेत का याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पो.हवा. सुभाष राऊत, पो. ना अमोल गवळी, पो.ना आदेश राऊत, पो.ना आमिर शेख,पो.ना निखिल जाधव,पो.कॉ अमोल देवकाते, पो.ना अभिजित गिरमे यांनी केली असून अधिक तपास पोलीस नाईक आमिर शेख करीत आहेत