
चकलांबा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार : श्रीकृष्ण खेडकर
चकलांबा/ प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आपापल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या कामाला लागले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक वंचित बहुजन आघाडी चकलांबा या सर्कल मध्ये स्वबळावर लढवणार. वंचितचे गेवराई तालुका सदस्य श्रीकृष्ण खेडकर म्हणाले की जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुका आमच्या सर्कल मध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर लढवणार.
सर्कलमधील लोकांच्या सदैव सुखा दुःखात आम्ही शामिल असतो त्यासह शैक्षणिक, सामाजिक अनेक कार्यक्रम आमच्या सर्कलमध्ये राबवले आहेत. तसेच पुढील काळातही समाजहिताचे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक कार्य कोणतेही असो २४ तास आम्ही जनसामान्यांच्या सेवेत आहोत.
समाज कार्यासह पक्षाचे ध्येय धोरणे राबवत, पक्षश्रेष्ठींच्या अदेशावरुन पक्ष वाढवण्यासाठी शाखा स्थापना करून सभासद नोंदणी केली. तसेच सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन पक्षाचे सुशिक्षित, शेतकरी, कष्टकरी, नौकरदार यांच्या हिताचे धोरणे यांच्या पर्यंतची यांच्यापर्यंत ची माहिती जनसामान्यांना दिल्याने वंचित बहुजन आघाडीकडे बहुजन समाज वळला आहे. यामुळे चकलांबा सर्कल मध्ये वंचितची मोठी ताकद निर्माण झाली आहे.
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सहकार्यांना सोबत घेवुन वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर लढवणार आहोत असे चकलांबा सर्कल चे युवा नेते तालुका सदस्य श्रीकृष्ण खेडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले.