
कोरडगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..
-पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल कोरडगाव च्या विद्यार्थ्यांनी सकाळी गावातून प्रभात फेरी काढून कोरडगाव ग्रामपंचायत येथे ध्वजवंदन करण्यात आले. कोरडगाव चे लोक नियुक्त सरपंच सौ साखरबाई नामदेव म्हस्के यांनी ध्वज पूजा केली व त्रिदल सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री भानुदास केदार मेजर यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल कोरडगाव येथे ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रवींद्र भोरू शेठ मस्के, श्री पंकज घुगरे मेजर, श्री चेमटे मेजर, पत्रकार रमेश देवा जोशी,श्री विनायक गुरुजी देशमुख,कोरडगाव ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, जिल्हा परिषद चे सर्व शिक्षक शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी तसेच कोरडगाव येथील सर्व जेष्ठ नागरिक व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी कोरडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका व शिक्षक तसेच न्यू इंग्लिश स्कूल येथील शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. रवींद्र उर्फ भोरु शेठ मस्के यांच्या संकल्पनेतून आदर्श शिक्षिका पुरस्कार जिल्हा परिषद च्या सौ.पांढरे मॅडम व न्यू इंग्लिश स्कूलच्या सौ .वावधने मॅडम यांना देण्यात आला. तसेच आजी-माजी सैनिकांचा कोरडगाव ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आला.
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...