
लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त मलकापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षातर्फे अभिवादन करण्यात आले.
भारताचे पहिले उपपंतप्रधान पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची 71 वी पुण्यतिथी निमित्य . सरदार वल्लभाई पटेल यांचा स्वातंत्र्य चळवळी च्या इतिहासात मोलाचा वाटा असून यांना स्वतंत्र भारताचा शिल्पकार मानले जाते. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली. सशक्त, सुदृढ आणि समृद्ध भारताचा पाया रचणाऱ्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शत-शत नमन. त्यांनी दाखवलेले मार्ग देशातील ऐक्य, अखंडता आणि सार्वभौमत्व यांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहतील सरदार पटेल यांनी तत्कालीन 556 65 संस्थाने भारतात विलीन करून एक संघ भारत निर्माण केला त्यांची ही कामगिरी ऐतिहासिक अशीच असून या कामगिरीने त्यांना भारतीय लोहपुरुष म्हटले जाते असे विचार यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी व्यक्त केले.
रासप कार्यालयांमध्ये यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटकर पाटील ज्येष्ठ पत्रकार उल्हासभाई शेगोकार, प्राध्यापक प्रकाश थाटे, रासप जिल्हा संघटक, सय्यद ताहेर उपाध्यक्ष, रासप मनीष शर्मा भैरव फौंडेशन शहराध्यक्ष, पत्रकार नागेश सुरंगे, धर्मेश राजपूत यावेळी उपस्थित होते.