
माळशिरसमधील गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य किटचे वाटप..
झोमॅटो कंपनी आणि सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम यांची सामाजिक बांधिलकी
दौंड :- आलिम सय्यद
हंगर हिरोज फीडिंग इंडिया बाय झोमॅटो कंपनीच्या सीएसआर फंडातून व सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम दापोडी यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील पुरंदरच्या पूर्व भागातील माळशिरस येथील गरीब, निराधार, विधवा, परीतक्ता, दिव्यांग लाभार्थींना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन माळशिरस ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भुलाजी गद्रे यांनी सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम दापोडी यांच्या माध्यमातून हंगर हिरोज फीडिंग इंडिया बाय झोमॅटो या कंपनीकडून मदतीची मागणी केल्यानंतर सुमारे शंभर लाभार्थींना अंदाजे ४५ किलो वजनाचे तीन हजार रूपये किंमतीचे अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री देविदास सुरवसे, संचालिका सौ. छबुताई सुरवसे, शिक्षक महादेव गायकवाड, झोमॅटो कंपनीचे ऑडिटर आकाश कदम, सरस्वती संस्थेचे शुभम मुर्तडक, उपसरपंच गोकुळ यादव, पोलीस पाटील नरेंद्र यादव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे, आदिनाथ यादव, तंटामुक्ती उपाध्यक्ष बाळासाहेब गद्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम गायकवाड, राष्ट्रतेज प्रतिष्ठानचे सचिव आप्पासो शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसरपंच गोकुळ यादव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे यांनी सूत्रसंचालन व नियोजन केले. ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ यादव यांनी आभार मानले. राष्ट्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे व प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. यावेळी सर्व लाभार्थीनी समाधान व्यक्त केलेल्या अनमोल मदतीबद्दल झोमॅटो कंपनी व सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम या संस्थेचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन मी सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम दापोडी यांच्या माध्यमातून हंगर हिरोज फीडिंग इंडिया बाय झोमॅटो या कंपनीकडून मदतीची मागणी केली असता या अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. झोमॅटो कंपनी आणि सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
*राजेंद्र भुलाजी गद्रे*
सदस्य, ग्रामपंचायत माळशिरस