
पांढरेवाडी येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
दौंड:- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्योलीत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व नंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला व शालेय मुलांची सावित्रीबाई यांच्या विषयी भाषणे झाली तसेच स्वरा योगेश भागवत ( वय वर्षे ७ ) हिने क्रिडा क्षेत्रात १४२ किलोमीटर सायकलिंग,५० प्रकाच्या दोरी उडया,१ मिनिटांत १०० पुषप काढणे, तसेच कुस्ती, रनिंग,पोहणे, या उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल तीची ऑल इंडिया गिरीश बुक मध्ये नोंद झाल्या बद्दल तिचा सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देउन सन्मान करण्यात आला तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षीकांचा सावित्रीबाई फुले यांच्या नावाने”आदर्श शिक्षिका” म्हणुन आलका भागवत, .भिमाबाई चव्हाण, दिपाली चव्हाण,निर्मला झगडे यांना पुरस्कार दिला तसेच मुलीना शिक्षण,क्रिडा,कला,विषयात प्रोत्साहीत करणा-या माताना “आदर्श माता” म्हणून राणी भागवत, सरस्वती झगडे यांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्तिथ म्हणून दौंड पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक विनोद घुगे व ,चांडाळ चैकटी च्या करामती फेम वेबशिरीज कलाकार आण्णा लोणकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी ,पांढरेवाडी गावचे सरपंच छाया झगडे, उपसरपंच रोहिणी बनकर, तंटामुक्त अध्यक्ष बाळकृष्ण भागवत, पोलीस पाटील विलास येचकर शाळा व्यवस्थापन कमिटी आर्पणा निंबाळकर , ग्रामपंचायत सदस्या पदमाताई गायकवाड, नितीन जाधव, संदिप जगताप, माझी सरपंच तात्यासाहेब शितोळे,सुरेश निंबाळकर, भिकाजी भागवत, राजेंद्र भागवत,सचिव राहुल झगडे,तसेच मा तंटामुक्त अध्यक्ष अनिल झगडे, आर पी आय युवक दौंड ता अध्यक्ष नवनाथ गायकवाड, नानासो झगडे, विकास झगडे , तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संत सावता महाराज पुण्यतिथी उत्सव समिती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील विलास येचकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी बिडवे यांनी तर आभार मुख्याध्यापक मच्छिंद्र रामगुडे यांनी केले