१६ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय अष्टेडू मर्दानी आखाडा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत पाटस गावच्या विध्यार्थ्यांचे यश.

दौंड:-अलीम सय्यद

या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील पाटस गावाच्या विद्यार्थ्यांचे यश प्राप्त केलंय . ही स्पर्धा दत्ता भक्त निवास देवगड ता. नेवासे जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आयोजक . सुरेश लहवाटे सर अष्टेडू आखाडा अहमदनगर चे अध्यक्ष , तसेच अष्टेडू मर्दानी आखाडा फेडरेशन ऑफ इंडिया चे सचिव महागुरू. राजेश तलमले , यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती, तरी या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यतून 27 जिल्हयातून 560 विद्यार्थीनि सहभाग नोंदवीला. यात पाटस च्या विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण पदक, ५ रौप्यपदक, व २ कांस्यपदक पटकाविले. या मध्ये विजेते विद्यार्थी,
१)वीर ऋषिकेश बंधिष्टी २२ ते २५ किलो वजनी गटांत सुवर्ण पदक. (शिवा व्हॅली स्कूल चौफुला)
२)पार्थ अविनाश देशमाने २६ ते २९ किलो वजनी गटात रौप्यपदक.
(मेरी मेमोरिअल स्कूल पाटस)
३)दीपक मारुती जाधव ३९ ते ४२ किलो वजनी गटात रौप्यपदक.
(ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल वरवंड)
४)गणेश अशोक जाधव ४३ते ४५ किलो वजनी गटात रौप्यपदक.
(नागेश्वर विद्यालय पाटस)
५)अर्जुन स्वानंद शिंदे २६ ते २९ किलो वजनी गटात रौप्यपदक.
(श्री. भानोब विद्यालय कुसेगाव)
६)समरप्रताप ऋषिकेश बंधिष्टी २१ किलोआतील वजनी गटांत रौप्यपदक.
(शिवा व्हॅली स्कूल चौफुला)
७)विहान औदुंबर शितोळे १६ किलो वजनी गटात कांस्यपदक.
८)श्रेयश मोहन पाटणकर ४३ ते ४६ किलो वजनी गटात कांस्यपदक.
(गोपीनाथ विद्यालय वरवंड)
तसेच उतेजानर्थ विद्यार्थी
१)विहान धवल वैद्य ( पोतदार इंटरनॅशनल स्कूल दौंड),
२)श्रीपर्व प्रकाश गोरे (मेरी मेमोरियल स्कॉल दौंड)
या सर्व विजेते विद्यार्थीचे हार्दिक अभिनंदन या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पुणे ग्रामीण अष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशनचे चे सचिव प्रदिप सुनिल शिवपुजे यांनी मार्गदर्शन केले. तसेंच टीमचे मेडिकल ऑफिसर डॉ. धवल वैद्य, व मृणाल वैद्य, टीम मॅनजर अजय तिरेकर यांनी काम पाहिले. या सर्व विद्यार्थ्यांना चे २८,२९, ३० नागपूर येथे राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!