
नवीन वर्ग खोल्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अडथळा विरहीत वातावरण सर्व सुविधा द्या:-चाँद शेख
शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
पंचायत समिती शेवगाव गटविकास अधिकारी यांना सावली संस्थेचे निवेदन
दिव्यांग अधिकार अधिनीयम २०१६ चे कलम ४१ नुसार दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सहज वावरणे,प्रवास करणे,संवाद व संपर्क करणे शक्य व्हावे यासाठी “अडथळा विरहित वातावरण” निर्मीती साठी दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 नुसार दिव्यांग सक्षमिकरण विभाग,सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय,भारत यांचे वतीने दिव्यांग व्यक्तीसाठी सुगम्य अभियान राबवण्यात येत आहे
जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत शेवगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी नवीन शाळा वर्ग खोल्या बांधकाम चालू आहे काही ठिकाणी बांधकाम चालू होणार आहे.ज्या ठिकाणी बांधकाम चालु आहे त्या ठिकाणी आम्हास दिव्यांग विद्यार्थांसाठी वर्ग खोल्यामध्ये व परीसरात सुलभ वावर होणेकरीता असणारी सुविधा जसे इमारतीमधील फुटपाथ उतार,वळणे,सुयोग्य रॅम्प,रेलींग,आधारासाठी कठडे,पार्कीग,आणीबाणीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी सुविधा,स्वतंत्र शौचालय,दृष्टीहिन दिव्यांगासाठी सेन्सरच्या फरशा,व्या सर्व सुविधा दिसुन येत नाही.सदर बांधकाम करण्याची निवीदा ज्या कंत्राटदारांना मंजुर करण्यात आलेली आहे त्यांना लेखी सूचना करण्यात याव्यात की सुगम्य भारत योजने अंतर्गत दिव्यांग विध्यार्थ्यांना वर्ग खोल्यात जाण्या येण्यासाठी शासन नियमानुसार सुसज्ज व उत्कृष्ट दर्जाचे रॅम्पसह सर्व सुविधा देण्यात याव्यात याबाबत सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शेवगाव गटविकास अधिकारी महेश डोके साहेब यांना सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख यांनी वरिष्ठ सहाय्यक अधिकारी शेलार साहेब व कनिष्ठ सहाय्यक अधिकारी चौरे साहेब पंचायत समिती शेवगाव यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी संभाजी गुठे, नवनाथ औटी,मनोहर मराठे,खलील शेख,गणेश महाजन,सुनील वाळके,शिवाजी आहेर,बाबासाहेब गडाख,अनिल विघ्ने यांनीही दिव्यांग विद्यार्थ्यांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
बिले काढण्यासाठी व फक्त दाखवण्यासाठी निकृष्ठ दर्जाचे रॅम्प तयार केले जातील.
कोणत्याही सुविधा नसतील तर अश्या शाळा वर्ग खोल्याचे बांधकामाचे बिल पास करू नये.
शासनाच्या नियमाांना डावलुन निकृष्ठ सुविधा दिल्या गेल्याचे दिसले तर संबधित जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी.सदर बाबत तक्रार किंवा आंदोलन व उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये.अन्यथा सावली दिव्यांग संघटनेचे माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल.दिव्यांग विध्यार्थ्यांना देखील सुलभपणे शिक्षणाच्या सोई सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी
चाँद कादर शेख
उपाध्यक्ष सावली दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य