
भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या सदस्यपदी चंद्रकांत वारघडे..
(कोरेगांव भीमा प्रतिनिधी विनायक साबळे) : तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातून गठित करण्यात आली. या समिती चे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी हवेली हे असून, पोलीस उपनिरीक्षक पुणे ग्रामीण,उप अभियंता पाटबंधारे विभाग,उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,उप विभागीय मृद संधारन आधिकारी,सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था व गटविकास अधिकारी हे शासकीय सदस्य असून चंद्रकांत वारघडे यांची अशासकीय सदस्य म्हणून नुकतीच जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या हस्ते पत्र देत निवड करण्यात आली.
चंद्रकांत वारघडे हे माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष असून माहिती अधिकार कायद्याचे गाढे अभ्यासक आहेत. माहिती अधिकार कायद्या विषयी अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यान देखील दिले आहे. गोर गरीब जनतेच्या अडीअडचणी सोडविणे. शासकीय कार्यालयातील अडचणी फोनवर सोडवून नागरिकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यात चंद्रकांत वारघडे नेहमीच पुढे असायचे म्हणूनच व शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार व राष्ट्रवादी चे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या शिफारसी मुळे शासनाच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भ्रष्टाचार निर्मूलन समिती वर त्यांची वर्णी लागल्याचे बोलले जात आहे..
दरम्यान चंद्रकांत वारघडे यांचे निवडीने त्यांचे शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार,हवेली राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,पुणे जिल्हा सहकारी बँकेचे मा संचालक प्रकाश म्हस्के,पुणे जिल्हा माहिती सेवा समिती उपाध्यक्ष अंकुश कोतवाल,माहिती सेवा समिती पुणे शहर संघटक सतीश अगरवाल,सुनील जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांनी माझेवर दाखवलेल्या विश्वासा बद्दल त्यांचे आभार मानतो व पुढील काळात हवेली तालुक्यात होणाऱ्या भ्रष्टाचार बाबत आवाज उठवून जास्तीत जास्त नागरिकांना मदत करणार.
श्री चंद्रकांत वारघडे
अध्यक्ष माहिती सेवा समिती