
जन परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक ट्रस्ट अहमदनगर वतीने रक्तदान शिबिर संपन्न..
शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने अध्यक्ष एडवोकेट लक्ष्मण रमेश बोरुडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शेवगाव येथील आदर्श विद्या मंदिर येथे केले होते. सदरील रक्तदान शिबिर मध्ये अहमदनगर येथील अर्पण ब्लड बँक मार्केट यार्ड यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबीरासाठी अर्पण ब्लड बँकेच्या डॉ भाग्यश्री पवार आणि त्यांच्या सहकारी डॉक्टर टीमने रक्त संकलनासाठीचे सर्व नियोजन केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी निदान क्लिनिकल लॅबचे संचालक फिरोज पटेल यांनी अथक परिश्रम केले.
सदर कार्यक्रमास माहिती अधिकार महासंघ व पत्रकार संरक्षण समिती चे संस्थापक वजीर भाई शेख, गरजे साहेब, रामनाथ रुईकर, दादासाहेब डोंगरे, दादासाहेब पाचरणे, बाळासाहेब बोडके, तापडिया महाराज, मधुकर मोहिते, पैलवान छगन पानसरे, निवृत्ती घोडके, बबन वडघने, अशोक नाईक, अशोक साखरे, वंचीत बहुजन आघाडी नेवासा तालुकाध्यक्ष उदय कर्डक, निलेश साळवे, सागर साळवे, सुरज काकडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गायकवाड, सोमनाथ जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक बाळकडूचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार सुरेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ट्रस्टचे जनरल मॅनेजर सी एम पाटील यांनी केले.
“रक्तदान म्हणजे जीवन दान. आपण केलेल्या रक्तदानामुळे दवाखान्यामध्ये असलेल्या एखाद्या पेशंटचा जीव वाचू शकतो. रक्तदान म्हणजेच श्रेष्ठदान गोरगरीब सर्वसामान्य जनतेला दवाखान्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असताना तयार झालेल्या परिस्थितीमध्ये योग्य तऱ्हेने रक्तपुरवठा व्हावा या संकल्पनेतून आणि आजच्या या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. भविष्यात रक्ताभावी कुणाचा जीव जाऊ नये ही संकल्पना साकारण्यासाठी आशा शिबिरांचे आयोजन केले गेले पाहिजे.”