जिरेगाव चे तलाव पाण्याविना कोरडे ठणठणीत..

दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील गावाला पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी , उपयुक्त ठरणारे तलाव हे कोरडे ठणठणीत पडल्याने या परिसरात पाण्याची अवस्था बिकट झाली आहे. दौंड तालुक्यात जिरेगाव परिसर हा जिरायत भागात येत असल्याने गावातील असणारा तलाव पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या वर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याने तलाव पूर्ण कोरडा ठणठणीत पडल्याने येथील नागरिक पाण्याविना हैराण झाले आहेत. येथील शेतकरी ही शेती या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने तलावच कोरडे ठणठणीत पडल्याने येथील शेतकरी देखील चिंतीत पडले आहेत पाणी कधी येईल जनावरांना चारा मिळेल का ? की चारा पण विकत घेण्याची वेळ येईल ? असा प्रश्न येथील ग्रामस्थ , शेतकऱ्यांना पडला आहे.
एका वर्षी गावात कसलेच पाणी नव्हते गावात पाण्यासाठी नागरिक हैराण झाले होते. त्यावेळी जिरेगावचे विद्यमान सरपंच भरत खोमणे यांनी स्व खर्चाने गावाला पाणी पाजून पुण्याचं काम केलं होतं. सध्या गावातील असणारे तलाव कोरडे ठणठणीत पडल्याने पाण्यासाठी ग्रामपंचायत ने जानाई शिरसाई विभागाला पैसे भरून पाणी सोडण्याची मांगणी देखील केली आहे. तसेच गावातील तलाव कोरडे पडल्याने विहरी, बोअरवेल च्या पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याची कमतरता भासत असल्याने दौंड तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना टँकर साठी ग्रामपंचायत ने मांगणी देखील केली आहे . तरी संबंधित विभाग यांना पैसे भरून देखील या गावाला पाणी मिळाले नसून या जिरेगाव तलावात पाणी येणार का तसेच पाणी लवकरात लवकर आणण्यासाठी जिरेगाव अजूनही काही पैसे भरून पाणी आणण्यासाठी मांगणी करत आहे .

 

*आम्ही सत्तावीस हजाराची धनादेश संबंधित विभागाला भरलेला आहे , काही दिवसापूर्वी पाणी आले होते परंतु जिरेगाव हे या जाणाई शिरसाई योजनेच्या खलील शेवटच्या भागात असल्याने या गावापर्यंत पाणी पोहचलेच नाही पाणी येण्यासाठी अनेक अडथळे येत असल्याने आम्ही अजूनही संबंधित विभागाचा काय कर असेल तो देण्यास तय्यार आहोत आम्हाला लवकरात लवकर पाणी मिळावे हीच आमची मांगणी आहे*

भरत खोमणे
लोकनियुक्त, सरपंच जिरेगाव

*जिरेगाव हे जानाई शिरसाई योजनेच्या खलील शेवटच्या भागात असल्याने पाणी जाण्यासाठी अनेक अडथळे येत असल्याने पाणी पोचले नाही. जिरेगाव साठी पाणी लवकरात लवकर सोडण्याचा आम्ही प्रयत्न करू*
रोहन ढमाले,
शाखा अभियंता
जानाई शिरसाई योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!