
पांढरेवाडी येथे शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
दौंड :- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पांढरेवाडी, मुकादमवाडी येथे शिव जयंती मोठ्या उत्साहात शासनाच्या नियमानुसार कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली.
जय भवानी जय शिवाजी अशी लहान मुलांनी घोषणाबाजी करत शिवजयंती साजरी झाली.
पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात ५० × ६० फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेचे छायाचित्र रेखाटन पांढरेवाडी गावचे पोलीस पाटील विलास येचकर यांनी त्यांच्या कलेतून साकारली आहे.हे रेखाटन चित्र करण्यासाठी सहकार्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवजयंती उत्सव समिती यांनी सहकार्य केले असून हा आगळा वेगळा उपक्रम असल्याने दौंड तालुक्यातून हे रेखाटन चित्र पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शिव प्रेमी आले होते . हा वेगळा उपक्रम राबवून पोलीस पाटील विलास येचकर यांनी एक वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे . यावेळी पांढरेवाडी ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन सरपंच छाया झगडे यांच्या हस्ते पूजन झाले तसेच पत्रकार आलिम सय्यद यांनी श्रीफळ फोडून पूजन केले तसेच जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल भाषणे झाली व भाषणे झालेल्या विध्यार्थ्यांना पांढरेवाडी ग्रामपंचायत च्या वतीने विध्यार्थ्यांना बक्षीस म्हणून एक वही पेन असं बक्षीस दिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख मचाले व ज्योती जाधव यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक मच्छिंद्र रामगुडे तसेच आभार प्रकाश सोमवंशी यांनी मानले यावेळी सरपंच छाया झगडे, उपसरपंच रोहिणी बनकर, पोलीस पाटील विलास येचकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप जगताप, नितीन जाधव, तंटामुक्त अध्यक्ष बाळकृष्ण भागवत, नानासो झगडे शालेय व्यवस्थापन अध्यक्षा पूर्वा गणेश निंबाळकर, अँड उमा गणेश कुलंगे, अँड.राहुल झगडे, जयेश राऊत, दीपक निंबाळकर,विजय लोखंडे, अलका भागवत, मंजिरी बिडवे, तसेच शिवजयंती उत्सव समिती चे पदाधिकारी, महिलावर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.