लाडजळगाव मध्ये दिव्यांग बांधवांना काकासाहेब तहकिक व दत्तात्रय तहकिक यांच्या हस्ते कुकर वाटप..

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
शिवजयंतीचे आवचित्त साधुन लाडजळगाव ग्रामपंचायत कडून दिव्यांग पाच टक्के निधी खर्च करण्यात आला.ग्रामपंचायत पाच टक्के निधीमधून 51 दिव्यांग व्यक्तींना सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक भाऊसाहेब,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख यांच्या उपस्थितीत काकासाहेब तहकिक व दत्तात्रय तहकिक यांच्या हस्ते कुकर वाटप करण्यात आले.सरपंच व उपसरपंच यांनी सर्व दिव्यांग बांधवाना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले.
पाच टक्के निधी वाटप कार्यक्रम करतांना सावली संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख म्हणाले की ग्रामपंचायत पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी आहे.सावली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांच्या न्याय व हक्कासाठी सावली संस्था व संघटना कार्य करत आहे.अनिता भाऊसाहेब क्षीरसागर पंचायत समिती शेवगाव,लताबाई काकासाहेब तहकिक सरपंच,दत्तात्रय हरिश्चंद्र तहकिक उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य रोहिदास भोसले,
कालिदास ढाकणे,महादेव गायकवाड, अशोक भिसे,गणेश घुमरे,जालिंदर दातीर,श्रीरंग तहकिक,कारभारी पाटील,अशोक तहकिक,रामकीसन काजळे, सुजाता पाटील,दिगंबर चव्हाण,ग्रामसेवक अहिरे भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी सुदाम घुमरे,रवी तहकिक,मनोहर बळे,सुनील वाळके यांचे सहकार्य मिळाल्याची माहिती सावली दिव्यांग संघटनेचे संघटक खलील शेख यांनी सांगितले.यावेळी सरपंच,
उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख,तालुका संघटक खलील शेख,सावली दिव्यांग संघटना लाडजळगाव शाखा अध्यक्ष वजीर पिंजारी,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अंबादास ढाकणे,नवनाथ वीर,ठकाजी वैद्य,ज्योती पाडळे,यासह सावली दिव्यांग संगटना लाडजळगाव शाखा पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून लाडजळगाव ग्रामपंचायत मधून पाच टक्के निधी खर्च करण्यात आला असून यामधून दिव्यांग व्यक्तींना कुकर वाटप करण्यात आले असून यासाठी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य,
सर्व ग्रामस्थ तसेच सावली दिव्यांग संस्थेचे व संघटनेचे सहकार्य मिळाल्याचे ग्रामसेवक अहिरे भाऊसाहेब यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!