
संतापजनक विधान करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कुरकुंभ येथे निषेध नोंदवण्यात आलाय..
महापुरुषांनी भीक मागून शिक्षण संस्था सुरू केल्या असे संतापजनक विधान करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कुरकुंभ येथे निषेध नोंदवण्यात आलाय
दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,
कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शिक्षण संस्था सुरू केल्या असे संतापजनक विधान करणाऱ्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कुरकुंभ येथे निषेध नोंदवण्यात आलाय.
उच्च तंत्र शिक्षण मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाज सुधारक कर्मवीर भाऊराव पाटील , महात्मा फुले ,व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली असे विधान करून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व महापुरुषांना भिकारी संबोधणाऱ्या वाचाळवीर चंद्रकांत पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करावी
अशी निवेदनाद्वारे मांगणी करण्यात आली असून त्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. 10 डिसेंबर ) रोजी दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे बाबासाहेब आंबेडकर चौकात कुरकुंभ ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला.यावेळी कुरकुंभ पोलिसांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्याध्यक्ष कुरकुंभ च्या माजी सरपंच जयश्री संदीप भागवत, आर पी आय दौंड तालुका उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, संदीप भागवत, माजी सरपंच आयुब शेख, विजय गिरमे, विलास येचकर, निलेश भागवत, धनंजय गिरमे, योगेश जाधव,राजू शेख, नितीन गिरमे, बाळासाहेब खंडाळे, रफिक शेख, दीपक पवार, तसेच कुरकुंभ ग्रामस्थ उपस्तिथ होते.