देवळाली प्रवरा येथील कोविड केअर सेंटरचे आ. लहुजी कानडे यांचे हस्ते उदघाटन..

देवळाली प्रवरा येथील कोविड केअर सेंटरचे आ. लहुजी कानडे यांचे हस्ते उदघाटन..

ऑक्सिजन ही उपलब्ध करून देण्याची आमदारांची ग्वाही!

श्रीरामपूर प्रतिनिधी -इमरान शेख

देवळाली प्रवरा (वार्ताहर) देवळाली प्रवरा येथे  स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव श्रीरामपूर रोडवरील सहारा मंगल कार्यालयात  शासनाचे ५०खाटांचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्यात आले आहे या कार्यालयाचे औपचारिक उदघाटन आमदार लहुजी कानडे यांचे करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण,प्रांताधिकारी दयानंद जगताप,तहसीलदार एफ.आर.शेख,गटविकास अधिकारी  गोविंद खामकर,तालुका आरोग्य अधिकारी रुपाली गायकवाड, देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी अजित निकत यावेळी उपस्थित होते.
सध्या कोरोना टेस्ट करूनही किंवा लक्षणे दिसून ही लोक घरी राहून कोरोनाचा प्रसार करीत आहेत. अश्या लोकांनी या कोविड सेंटर मध्ये दाखल व्हावे. या ठिकाणी तज्ञ डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी व आवश्यक ती सर्व औषधे व ॲम्बुलन्स पूर्ण वेळ मोफत उपलब्ध असणार आहेत.रुग्णांना मोफत उपचरासह नास्ता,जेवण,पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध असणार आहे.
कोरणाचे लक्षणे दिसू लागतात आपली चाचणी करून या ठिकाणी राहून उपचार घेतले तर कोरोना निश्चित बरा होऊ शकतो.
हे कोविड सेंटर विशेषतः श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात असणाऱ्या राहुरी तालुक्यातील ३२गावांच्या नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आले असल्याचे यावेळी आमदार कानडे यांनी सांगितले.
याप्रसंगी मंडल अधिकारी सतिश कानडे, तलाठी दीपक   साळवे,अमजद इनामदार,सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.
चौकट-१
या कोविड सेंटरच्या रुग्णासाठी १० लिटर व ५ लिटर क्षमता असलेले ऑक्सिजन मशीन  व ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असावेत असे तहसीलदार यांनी यावेळी सुचवले असता हे सर्व साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार कानडे यांनी दिल्याने आता या ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन ही उपलब्ध होणार असल्याने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी आमदार कानडे व तहसीलदार शेख यांचे आभार मानले.
चौकट-२
टाकळीमियाचे तरुण देणार मोफत ॲम्बुलन्स सेवा!
नव्याने सुरू झालेल्या या कोविड सेंटर साठी चोवीस तास आंबूलन्स सेवा उपलब्ध करून देण्यासाठी टाकळ मियाँ येथील मोसीन पठाण,नशीब पठाण,बापूसाहेब लांडगे,शाकिर पठाण या चार तरुणांनी तहसीलदार शेख यांचे आवाहनाला प्रतिसाद देत याठिकाणी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!