
मुले सुखी तर पालक सुखी -श्री विजय करे साहेब पोलीस निरीक्षक नेवासा पोलीस स्टेशन
14 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी गेवराई येथे भारत सेवा संघ पाचेगाव संचलित न्यू इंग्लिश स्कूल गेवराई तालुका नेवासा येथे मातृ-पितृ पूजन दीना निमित्त सोहळा उत्साहात पार पडला
मातृ-पितृ पूजन दिवस सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. श्री विजय करे साहेब व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नेवासा श्री शिवाजी कराड साहेब हेही उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कल्हापुरे सर होते तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्ताविक सौ जंगले मॅडम आणि सूत्रसंचालन विद्यालयाच्या प्राचार्य सौ.पाटील मॅडम यांनी केले. व्यासपीठावर उपस्थित गेवराई गावचे सरपंच श्री. कपूरचंद कर्डिले पोलीस पाटील श्री.संभाजी कर्डिले ग्रामपंचायत सदस्य श्री. वसंत कर्डीले, सोसायटीचे व्हा.चेअरमन रेवणनाथ पाटेकर, सुलतानपूरचे पोलीस पाटील देशमुख साहेब . तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी
तसेच सोशल मीडिया संयोजक जालिंदर आदमने व शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी त्यांचे पालक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय करे साहेब यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे वर्णन सांगितले तसेच विद्यार्थ्यांना त्यांचा रोजचा दिनक्रम कसा असावा व पालकांनी आपल्या मुलांवर कसे संस्कार करावे कुटुंबतील व्यक्तीना वेळ द्या हे सांगितले व मुले सुखी तर पालक सुखी असा संदेस देऊन आपले मनोगत संपवले
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पाटील मॅडम यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Maharashtra News 10
प्रतिनिधी वैभव जगताप नेवासा