
शेतकऱ्यांच्या कांद्याला अनुदान द्या -रासप प्रदेशाध्यक्ष शेवते..
अहमदनगर : यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याचे उत्पादन चांगले आहे, त्यामुळे अर्थातच बाजारपेठेत आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विका जातो आहे. राज्यातील शेतकरी आधिच विजेच्या लपंडावामुळे पूर्ता हैरान झालेला असून सध्या कसेबसे परात पडलेले कांदा पिकास अत्यंत कमी भाव मिळाल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आला आहे त्यांना कांदा क्विंटल १५०० रु खर्च येतो परंतु आज बाजारात ३०० ते ५०० दराने विकला जातो आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होणार आहे. तरी आतापर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना क्विंटलला १००० रुपये अनुदान देण्यात यावे आणि यापुढे किमान ३००० रुपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली.राहुरी चे तहसीलदार फसुद्दीन शेख यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ शेवते,मुख्यमहासचिव माऊली सलगर, राज्य सचिव रवींद्र कोठारी, राज्य कार्यकारणी सदस्य मा.सय्यदबाबा शेख, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरदभाऊ बाचकर, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, शिर्डी लोकसभा अध्यक्ष डॉ.सुनील चिंधे, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णताई जराड, आदींच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.*
*तसेच यावेळी युवक जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ खेमनर, जिल्हाउपाध्यक्ष सिताराम वनवे नानासाहेब काटकर, नानासाहेब जगताप,मुनीरभाई शेख, सुशीलाताई शेवाळे, रमेश बनकर,सोपान तांबडे,भगवान करवर,गोरक्षनाथ हासे ,गोरख येळे ,मलोजि तिखोले,बिलालभाई शेख, कपिल लाटे ,करण माळी, अक्षय सुपणर, वैभव कोळपे , प्रवीण बनकर,वैभव सोनवणे विलास सैंदोरे,रवींद्र जाधव,सिद्धार्थ काकड आदि उपस्थित होते*