सांज चिमणपाखरांची” ‘जिल्हा परिषदप्राथमिक शाळा गेवराई येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न’..

सांज चिमणपाखरांची” ‘जिल्हा परिषदप्राथमिक शाळा गेवराई येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न’

गेवराई ता नेवासा येथे १ मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई. या शाळेचे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे स्नेह संमेलन उत्साहात साजरे झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. सुनंदाताई कर्डिले ह्या होत्या. अध्यक्षीय सूचना श्री. रामेश्वर चोपडे सर यांनी मांडली . तर अनुमोदन बापूसाहेब सोनवणे सर यांनी दिले . कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून गेवराई ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ.सविताताई आदमने, ग्रामपंचायत सदस्या सौ. अनिताताई कर्डिले ह्या होत्या.
तर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समिती नेवासा गट शिक्षणाधिकारी माननीय श्री शिवाजी कराड साहेब, मुख्याध्यापक धानापुने सर ,केंद्रप्रमुख नामदेव शिरसाट सर ,महाराष्ट्र राज्य प्राथमिकशिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय श्री. बापूसाहेब तांबे, प्राध्यापक बाळासाहेब मंडलिक सर, श्री.अनिल कर्डिले, श्री. दिलीपराव आदमने, श्री.वसंत कर्डिले सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सोमनाथ पाटेकर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
विद्यार्थी हा शाळेचा अलंकार असून पालक व शिक्षक मिळून त्यांना योग्य मार्गाने घेऊन जाऊ शकतात,त्या साठी पालकांनी शिक्षकांना सहकार्य करायला पाहिजे आणि यात हे गेवराई गाव कुठेही कमी नाही,
हे दिसून येते असे मत उद्घाटक श्री. शिवाजी कराड साहेब यांनी मांडले.
या संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थीनी पोवाडा,कोळी गीत,बालगीत,लावणी, फिल्मी गाणे विनोदी बातम्या असे विविध नृत्याविष्कार व नाटके, सादर केली.किलबिल चिमण पाखरांचे उपस्थितांकडून अक्षारश: बक्षिसांचा पाऊस पाडत व टाळ्यांचा प्रतिसादात कौतुक करण्यात आले.
हा कार्यक्रम घडून आन्यासाठी शाळेतील सर्वच शिक्षक -शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
पंचक्रोशीतील ग्रामस्थ शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी व त्यांचे पालक,
मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती .कार्यक्रमाचे उत्कुष्ठ सूत्रसंचालन श्री.राऊत गुरुजी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार
श्री. शिवराज जाधव सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Maharastra news 10 प्रतिनिधी जालिंदर आदमने सह वैभव जगताप नेवासा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!