
नागरिकांनी घाबरून न जाता प्रथम कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे : आमदार लहू कानडे
श्रीरामपूर प्रतिनिधी – इमरान शेख
दुसऱ्या लाटेमध्ये कोविडचा प्रसार खेड्या पर्यंत पोहोचला आहे. कोविडच्या अनाठाई भीतीपोटी अनेक जण घरीच उपचार घेत आहेत किंवा कोविडची चाचणी करून घेण्याचे टाळत आहेत. वास्तविक ताप, खोकला, अंग दुखणे, सर्दी, थकवा अशी लक्षणे दिसतात कोविडची चाचणी करून घेणे व चाचणी पॉझिटिव आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक असताना तसे न करता घरातच थांबल्याने संपूर्ण कुटुंबच बाधित होताना दिसत आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये यामुळेच रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वास्तविक 85 ते 90 टक्के रुग्णांना केवळ कोविड केअर सेंटर मध्ये थांबून तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेऊन बरे होता येते. पहिला लाटेमध्ये ही हे सिद्ध झाले आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघामध्ये शासनाच्या वतीने 500 रुग्णांसाठी अद्ययावत कोविड केअर सेंटर आपण सुरू केले आहे. तसेच देवळाली प्रवरा येथेही शासनाच्या वतीने पन्नास खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या दोन्ही ठिकाणी सकाळी नाश्ता, दोन वेळचे जेवण, शुद्ध व स्वच्छ पाणी आणि सरकारी डॉक्टरांच्या निगराणी खाली 24 तास नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखी मध्ये कोरोन वर उपचार केले जातात. या सर्व सेवा शासकीय को बीड सेंटर मध्ये मोफत दिल्या जातात. शिवाय एखाद्या रुग्णाला ऑक्सीजन बेडची किंवा अधिक उपचाराची आवश्यकता भासल्यास अशी सुविधा असणाऱ्या कोविड उपचार केंद्रा मध्ये किंवा दवाखान्यामध्ये पाठवले जाते. तेव्हा नागरिकांनी घाबरून न जाता व रिपोर्ट पॉझिटिव्ह असूनही घरातच थांबून आपल्या प्रियजनांना संसर्ग न करता कोबी केअर सेंटर मध्ये दाखल झाले पाहिजे असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील आठ दिवसांपासून गावोगावच्या ग्राम सुरक्षा समित्या कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले होते. त्यानुसार गावोगाव विलगीकरण कक्ष व बेलापूर, पडेगाव, वळदगाव आधी आणि गावात ग्रामपंचायतीमार्फत आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी मार्फतही नवे नवे कोविड केअर सेंटर सुरू झाले आहेत. श्रीरामपूर शहारा मध्येही स्व. जयंतराव ससाणे कोविड केअर सेंटर, नगरपालिकेचे को वि ड केअर सेंटर, तसेच बुवा ग्रुप चे संगमनेर रोडवरील कोविड केअर सेंटर व इतरही स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी कोविड केअर सेंटर सुरू केलेले आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी मोठीच व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या कुटुंबामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांनी स्वतःहून कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्हावे. तेथे त्यांना सर्व प्रकारचे उपचार मिळण्याची व्यवस्था आहे. आणि यामुळेच आपले शेजारी घरातील नातलग संसर्ग होण्यापासून वाचू शकतात. शिवाय आता शासनानेच विलगीकरण आवश्यक केल्याने शासकीय कर्मचारी अधिकारी घरातच उपचार घेणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणार आहेत. त्यामुळे स्वतः पुढाकार घेऊन शासनाने व स्वयंसेवी संस्थांनी मोफत औषधोपचार करणारी ही जी कोविड केअर सेंटर सुरू केलेली आहेत येथे तातडीने दाखल व्हावे असे नम्र आवाहन आमदार श्री लहू कानडे यांनी केले आहे.
दाखल होण्यासाठी खालील नंबरशी संपर्क करावा
श्रीरामपूर : 9422940007
8369487076
देवळाली प्रवरा : 9970023352
आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर व राहुरी चे तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना सर्वच घरीच उपचार घेणाऱ्या कोरणा रुग्णांना कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करून घेण्याबाबत शासकीय स्तरावरून कडक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दोन ग्रामपंचायती मिळून एका संपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करून गावोगावच्या सरपंचांशी संपर्क करून प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचेही आवाहन केले आहे. उत्तम काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचनानाही प्रशासनाला दिल्या आहेत. समाजातील स्वयंसेवी कार्यकर्त्यांनीही पुढे येऊन एकदिलाने या संकटाचा मुकाबला करण्याचे आवाहनही आमदारांनी केले आहे. तसेच श्रीराम पुर व देवळाली प्रवरा येथील शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होण्यास काही अडचण आल्यास माझे जनसंपर्क कार्यालय ०२४२२-२२७७३२ वर संपर्क करावा.