
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप..
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप
नेवासा(प्रतिनिधी)शुक्रवारी दि.२८ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण होत असतांना सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे श्रीरामपूर रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते त्यात प्रवरा नदीच्या पुलावर बंदीस्त असलेल्या नळयांमुळे पुलालाच नद्याच स्वरूप प्राप्त झाले होते,सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकात त्रिव संताप व्यक्त जात आहे.
श्रीरामपूर रोडवरील प्रवरानदीच्या पुलावर पाणी जाण्यासाठी मोऱ्या काढल्या नसल्याने शुक्रवारी सकाळी११.३० ते १२.१५ या दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते,दुचाकी चालकांना यामुळे पायवर करूनच वाहने चालवावी लागली,तर चार चाकी वाहन चालकांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल झाले हीच परिस्थिती प्रवरापूल ते खोलेश्वर गणपती मंदिरा पर्यन्त होती.
सार्वजनिक बांधकाम खात्याने सतत दुर्लक्ष केल्याने येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चित्र दिसून येत होते पाणी जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था केली नसल्याने या भागातील
रस्ते तुंबले होते,कसरत करतच वाहन चालकांना या रस्त्यावरून जावे लागले.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वरील समस्यांची सोडवणूक न केल्यास नागरिकांना बरोबर घेऊन त्रिव आंदोलन करण्यात येईल असा ईशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिला.
महाराष्ट्र न्यूज 10 साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा