पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..

पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले .
बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्याकडून पाहणी.
.आज दिनांक. २८-९-२०२३ रोजी दुपारी .३ वाजता पाथर्डी पैकी डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात १४ घराचे नुकसान झाले…
याची माहिती पाथर्डी ग्रामपंचायत चे सदस्य दिलीप वाघ यांनी देताच सदर ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी डोंगर पाडा येथे भेट देऊन सदर घराची पाहणी तत्काळ जावून ६. ला केली असता…
या गावचे रहिवासी श्री.गणेश राजाराम फडवले, हरीचद्र किसन सानकरे,राजाराम रतन बुधर,अरविंद चंदू खरपडे,देविदास चंदू खरपदे,प्रकाश कृष्णा फडवले,गणेश रामू खांझोडे,किरण बाळू खांझोडे,राजाराम धर्मा फडवळे.बाळकृष्ण चंदू खरपडे,बंधू सोमा पारधी,काशिनाथ जानू पारधी, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे…
एकनाथ दरोडायांनी याची प्रत्यक्षात पाहणी केली..
व तत्काळ दूरध्वनीवरून संपर्क करून जव्हार उप जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नेहा भोसले मॅडम यांना संपर्क केला…
व त्यांना तात्काळ पंचनामा करून लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी केली….
यावेळी पाथर्डी ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच सुनील वातास, साकुर ग्रामपंचायत सदस्य प्रदीप डबाळी,दिलीप वाघ पाथर्डी ग्रामपंचायत सदस्य,जयश्री खरपडे ग्रामपंचायत सदस्य पाथर्डी,शांताराम फडवले,बाळकृष्ण फडवले,गणेश खांझोडे,राजाराम फडवले व हरिश्चंद्र सानकरे व गावकरी उपस्थित होते।…….
*जव्हार वरून जहीर शेख यांचा रिपोर्ट।…..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!