आयटीआय विक्रमगडचा अजून विस्तार व्हावा – श्री. चैतन्य दिवेकर ‘स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची सांगता’..

औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड जिल्हा पालघर येथे 17 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाची सांगता आलोंडे येथील DIVEKAR WALLSTABE & SCHNEIDER PRECISION SEALS PRIVATE LIMITED कंपनीचे संस्थापक संचालक श्री चैतन्य दिवेकर यांच्या हस्ते झाले. स्वच्छता पंधरवड्यामध्ये आयटीआय विक्रमरच्या प्रशिक्षणार्थ्यांनी कॅम्पसची स्वच्छता, गवत छटाई, यंत्रसामग्रीची दुरुस्ती व देखभाल, विद्युत दुरुस्ती आणि वाहनांची दुरुस्ती अशी कामे केली. ‘स्वच्छता ही सेवा’ या केंद्र शासनाच्या कार्यक्रमांतर्गत विक्रमगड नगरपंचायत यांच्या विविध स्वच्छतेच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. स्वच्छता आणि कौशल्य प्रशिक्षणाविषयी जनजागृती केले. या कार्यक्रमाची सांगता प्रसंगी श्री दिवेकर यांनी आयटीआय विक्रमगड येथे भेट घेऊन प्रशिक्षण त्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. ‘आयटीआय विक्रमगड येथे व्यवसायांमध्ये उत्तम विविधता आहे. त्यामुळे विविध कौशल्य आत्मसात करण्यास स्थानिक उमेदवारांना मदत होते आहे. संस्थेचा अजून विस्तार झाल्यास प्रशिक्षणार्थी आणि त्यासोबतच स्थानिक उद्योग यांना फायदा होईल. याकरिता प्रयत्न करावे.’ असे प्रतिपादन केले. डी डब्ल्यू एस कंपनीचे एच आर आणि आयटीआय विक्रमगडच्या संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संदीप बिडवे यांनीही प्रशिक्षणार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. संस्थेला स्वतःची जागा आणि प्रशस्त इमारत उपलब्ध झाल्यास प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. आयटीआय विक्रमगड विविध कार्यक्रमांमध्ये कायम सक्रिय सहभाग घेऊन प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता प्रयत्न करत असते आणि पुढेही करीत राहील,असे संस्थेचे प्राचार्य श्री रोहन चुंबळे यांनी सांगितले. सर्व पाहुण्यांना स्वतः विद्यार्थ्यांनी तयार करण्यात आलेले पुष्पगुच्छ आणि वारलीचित्र देऊन स्वागत केले गेले. तसेच संस्थेमध्ये तयार करण्यात आलेले विविध वस्तू यांचे प्रदर्शनही मांडण्यात आले. स्वच्छता पंधरवड्यामध्ये श्री महेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा गवळी, विजय दळवी, भाविका तुंबडे, अरुण राऊत, वाघचौरे सर, सर्वेश मेघे, तुंबडा सर यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
जव्हार वरून जहीर हमीद शेख यांचा रिपोर्ट।…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!