
गेवराई येथे मुकबधीर व मतिमंद विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..
गेवराई येथे मुकबधीर व मतिमंद विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
—————————-
गेवराई :
रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कै.भगवानराव ढोबळे मुकबधीर निवासी विद्यालय व मतिमंद निवासी विद्यालय गेवराई येथे २६ जानेवारी रोजी ७५ वा भारतीय प्रजासत्ताकदिन मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश इंगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सावळेरामदादा पौळ, मुख्याध्यापक माणिकराव रणबावळे, सा.बीड राज्यकर्ताचे संपादक अमोल वैद्य, सामाजिक कार्यकर्ते सय्यद माजेद, मराठवाडा न्युजचे संपादक शेख जावेद, विशाल बोबडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वप्रथम महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी संपादक अमोल वैद्य यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन विनोद पौळ यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी ढोबळे, रविंद्र अरबाड, प्रल्हाद बोंदरे, संदिप खाडे, रामदास ढोबळे, भागिरथी उगले, कृष्णा लाटे, विष्णू बर्वे, अंकुश लाटे, अक्षय दातार, गोविंद कदरे, प्रशांत सरोदे, संतोष पुंड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सनशाईन पब्लिक स्कूल, गेवराई या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.