
अनुभवा मेगा अॅक्शन ब्लास्ट ‘स्कंद’च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरसोबत 16 जून रोजी फक्त झी सिनेमावर..
जेव्हा स्क्रीनवर अॅक्शन आणि थरार निर्माण होतो, तेव्हा प्रेक्षकांना अविस्मरणीय मनोरंजन प्राप्त होते. ‘स्कंद’ हा चित्रपट ह्याच गोष्टीचे प्रतीक आहे. जबरदस्त अॅक्शन दृश्ये, थिरकायला लावतील अशी नृत्ये, शक्तीशाली अभिनय आणि थरारक कथानकासाठी सज्ज व्हा कारण झी सिनेमा घेऊन येत आहे मनोरंजक चित्रपट ‘स्कंद’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर रविवार, 16 जून रोजी रात्री 8 वाजता. यात राम पोथिनानीची प्रमुख भूमिका आहे.
महान दिग्दर्शक बोयापति श्रीनू यांच्यातर्फे दिग्दर्शित हा चित्रपट निश्चितपणे भव्यदिव्य असेल. अखंड, सिंह, लिजंड आणि सराईनोडू अशा ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांवर काम करण्यासाठी मानले गेलेले श्रीनू हे भव्यदिव्य अॅक्शन एंटरटेनर्स निर्माण करण्यासाठी नावाजलेले आहेत. हा चित्रपटही ती परंपरा कायम राखतो आणि भव्य स्तरावर मोठा अनुभव प्रदान करेल. आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा आणि परिवारासोबत पाहता येईल अशा ह्या चित्रपट पाहणे अजिबात चुकवू नका.
‘स्कंद’मध्ये श्रीलीला आणि राम पोथिनानी यांच्या भूमिका असून त्यांच्यासोबत सई मांजरेकर, प्रिन्स सेसिल, पृथ्वीराज आणि अन्य कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
टेलिव्हिजन प्रीमिअरच्या माध्यमातून विस्तृत स्तरावर हा चित्रपट पोहोचण्याबद्दल अतिशय उत्साहात असलेला आणि ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा राम पोथिनानी म्हणाला, “भारतामध्ये सिनेमाचे एकमेव लक्ष्य आहे आणि ते म्हणजे परिवारांचे मनोरंजन करणे आणि त्यांच्यासाठी वेळ चांगल्याप्रकारे व्यतीत करण्याचे साधन देणे. ह्या चित्रपटासह आम्हांला असे काहीतरी निर्माण करायचे होते ज्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल आणि त्यांच्यासाठी ते थरारकही ठरेल. ‘स्कंद’ हा चित्रपट उच्च उर्जायुक्त अॅक्शन आणि नाट्य यांनी भरलेला आहे आणि झी सिनेमाचे आभार मानायला हवेत की आता घरच्या घरी हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकणार आहे.”
श्रीलीला म्हणाली, “ह्या चित्रपटामध्ये दोन लिजंड्ससोबत काम करणे हा खूपच जबरदस्त अनुभव होता. ह्या चित्रपटामध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहे, मग ती अॅक्शन, नृत्य, इमोशन, प्रणय, सूड, अगदी सगळं काही यात आहे आणि झी सिनेमावरील याच्या प्रीमिअरबद्दल मी उत्साहात आहे. आमच्या कठोर परिश्रमांना प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय आहे ते पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
पहा ‘स्कंद’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर रविवार, 16 जून रोजी रात्री 8 वाजता फक्त झी सिनेमा वाहिनीवर