
दौंड तालुक्यातील तरुण युवक तसेच शेतकऱ्यांनी बांधले शिवबंधन !
दौंड :- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यात शिवसेना पक्षात अनेक तरुण युवक तसेच शेतकरी प्रवेश करत आहे. या प्रवेश करणाऱ्या मध्ये युवक कार्यकत्यांची संख्या वाढली आहे. काही दिवसापुर्वी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष माऊली आहेर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा तालुक्यातील काही युवकांनी तसेच तालुक्यातील शेतकरी यांनी जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यापासून आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे उध्दव ठाकरे असल्याने आणि त्यातच महेश पासलकर यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यापासून सध्या तालुक्यातील विविध पक्षाचे युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत. यावेळी दौंड विधानसभा मतदार संघातील शेतकरी संपत शिंदे, रमेश कुदळे, मारुती गावडे, शिवाजी पवार यांनी दि.२३ रोजी चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांच्या उपस्थितीत शिवबंधन बाधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माउली आहेर , शंकरराव शितोळे, प्रशांतभाऊ जगताप , विभागप्रमुख हनुमंत निगडे, इतर पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर म्हणाले की, शिवसेनेत काही दिवसापूर्वी रयत क्रांती पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष, माउली आहेर यांनी समर्थकासह पक्ष प्रवेश केल्याने तालुक्यातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असून, रोज नव्या दमाचे कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक वर्षापुर्वी राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी केली होती त्या अनुशंगाने दौंड तालुक्यांतील शेतक-यांची अंदाजे ४०० कोटी रूपयांची कर्जमाफी झालेली आहे महाविकास आघाडी सरकार च्या माध्यमातून शेतकरी हिताचे होत असलेल्या निर्णयांमुळे शेतकरी कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे कल वाढत आहे